ठाणे: मणिपूर येथे वांशिक दंगलीत आदिवासी महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने ठाण्यात टेंभी नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध केला तसेच महिला शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उप शहर प्रमुख संतोष शिर्के, सहप्रवक्ता तुषार रसाळ, युवासेना अधिकारी किरण जाधव, विभाग प्रमुख राजेंद्र महाडिक, वसंत गवाळे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक समिधा मोहिते, नंदा कोथळे, आरती खळे तसेच इतर शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दंगलीत घडलेल्या घटनेची सखल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी असे निर्देश आपल्या स्तरावरून केंद्रीय गृहमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना द्यावे, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.