ठाणे: ठाणेवैभव करंडक स्पर्धेच्या आज क गटातील प्रथम फेरीत मालवण कट्टा संघाने स्पर्धेत प्रथमच उतरलेल्या ॲपलाईड क्लाउड संघाला धूळ चारली.
मालवण कट्टाच्या निशय नवले याने ९८ चेंडूत १३ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १०२ धावा केल्या. तर अमित राठोरे याने अडीच षटकांत पाच आणि ॲपलाईड क्लाउडतर्फे अनिकेत महाले याने सात षटकांत ३१ धावा देत पाच बळी मिळवले.
मालवण कट्टा संघाच्या २६९ धावांचा पाठलाग करताना स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेला ॲपलाईड क्लाउडचा संघ ७४ धावाच उभारू शकला.
संक्षिप्त धावफलक
क गट प्रथम फेरी
मालवण कट्टा: ३३ षटकांत ८ बाद २६९ धावा ( पवन चंडेल ३९, निशय नवले १०२, अनिकेत महाले ३१ धावांत पाच बळी विजयी विरुद्ध ॲपलाईड क्लाउड १७.५ षटकांत ७४ (उन्कार नंदा ८ धावांत पाच बळी, अमित राठोरे सहा धावांत पाच बळी)