मैथिली ठाकुरच्या गाण्यांना वन्स मोअर

अंबरनाथ : शिवमंदिर फेस्टिव्हलचा शनिवारचा दिवस मोहित चौहान यांनी तर रविवारची पहाट मैथिली ठाकूर यांच्या निरागस गाण्यांच्या कार्यक्रमाने गाजली.
अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचा शनिवारी 18 मार्च ला तिसरा दिवस पार पडला.’ शंकर संकट हरना ‘ या गाण्याने मोहित चौहान यांनी मैफलीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी त्यांच्या सदाबहार ‘तुम सेही, दुरिया, पिलू यांसारखी लोकप्रिय गाणी गात उपस्थितांची मने जिंकली.
अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला अंबरनाथकरांसह इतर शहरांतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या संगीत संध्येची सुरुवात मोहित चौहान यांनी ‘शंकर संकट हरना’ या गाण्याने केली. यानंतर दूरिया, तुम से ही, मसकली, हवा हवा, तुम से ही, पिलू, मटरगष्ती यांसारखी एकाहून एक लोकप्रिय गाणी गात प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
दरम्यान आज रविवारी पहाटे लवकर मैथिली ठाकूर यांच्या सुरेल सुरांनी रसिकांच्या वन्स मोअर, आणि टाळ्यांच्या कडकडाटात हिंदी आणि मराठी भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पहाटे 5 वाजल्यापासून रसिकांच्या गर्दीने शिवमंदिराचे प्रांगण तुडुंब भरून गेले होते. पंडित भीमसेन जोशी यांच्या माझे माहेर पंढरी या अभंगाने मैथिलीने मैफल सुरु केली. त्यानंतर शंकर, प्रभू श्रीराम, श्रीकृष्णाची आराधना करणारी विविध भजने सादर केली. तोडा है धनुष्य सीता से नाता जोडा है, याच बरोबर मनी नाही भाव, देवा मला पाव, अबीर गुलाल उधळीत रंग , कानडा राजा पंढरीचा अशी भक्तिगीते सादर करून रसिकानी ठेका धरला, शिवाय काही रसिकांच्या पसंतीची गाणी सादर करून वन्स मोअरची मागणी जोर धरत होती.