ठाणे : येथील १७ वर्षीय महेक पोकर या विद्यार्थिनीची भारत (अ) १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे.
महेक यष्टीरक्षक-फलंदाज असून २०१९ पासून मुंबईच्या १९ वर्षाखालील संघातून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. भारत (अ) १९ वर्षाखालील संघाचा एक भाग म्हणून विझाग येथे १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या महिलांच्या १९ वर्षाखालील चतुर्भुज मालिकेत सहभागी होणार आहे. भारत (ब), श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे तीन संघ भारत (अ) समवेत या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
आयसीसी महिला १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जवळ आलेली असताना ही मालिका या स्पर्धेसाठी भारतीय संघ निश्चित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे. १४ ते २९ जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत विश्वचषक खेळला जाणार असून या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत.