केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली

राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाने केले गाजर आंदोलन

ठाणे : केंद्र सरकारने अर्थसंकल्प केला सादर… महाराष्ट्राच्या हातात दिले गाजर”, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात गाजर आंदोलन केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेशावर खैरात केली असली तरी महाराष्ट्राला फारसे काही दिलेले नाही. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाने आज ठाण्यात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतले होते. यावेळी बॅनर्स आणि फलक झळकावत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात शहर अध्यक्ष सुहास देसाई, प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, युवती निरीक्षक प्रियांका सोनार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.