ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एकूण सहा उद्योगांना महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार जाहीर करण्यात आले असून राज्यात कोकण विभाग प्रथम क्रमांकावर आणि कोकण विभागात ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
कोकण विभागातील उद्योगांना ठाणे-6, रत्नागिरी-6, रायगड-4, पालघर-3 सिंधुदूर्ग-1 असे मिळून एकूण 20 निर्यात पुरस्कार मिळाले. पुणे-वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे आयोजित “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील मे. अपर इंडस्ट्रिज लि., मे. कनेक्टवेल इंडस्ट्रिज प्रा.लि., मे.ज्योती स्टील इंडस्ट्रिज, मे. कविश फॅशन प्रा.लि., मे. सचिन्स इम्पेक्स, मे. दलाल प्लास्टिक प्रा.लि., या उद्योग घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत, कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व कोकण विभाग उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या यशासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सीमा पवार यांच्यासह उद्योग विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.