कल्याण : कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालयात चांद्रयान ३ची महारांगोळी साकारली आहे. छत्रपती शिक्षण संस्थेचे नूतन विद्यालयाच्या पटांगणात दीपोत्सव निमित्ताने ७० फूट बाय ४० फूट आकाराची चांद्रयान 3 ही महारांगोळी विद्यालयाचे कलाशिक्षक श्रीहरी पवळे आणि विद्यार्थी यांनी साकारली.
या दीपोत्सवामध्ये पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि नूतन विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका साबळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद या मुख्याध्यापकांनीही सहकार्य केले. कला शिक्षक श्रीहरी पवळे आणि विद्यार्थ्यांनी एकूण चार तासात ही रांगोळी पूर्ण केली. यासाठी एकूण चारशे किलो रांगोळी वापरण्यात आली.
कल्याणमधील प्रतिष्ठित मान्यवरांनी, पालकांनी, माजी अध्यक्ष अशोक प्रधान यांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.