मफतलाल, रूट मोबाईल, एल अँड टी विजेते
ठाणे: ‘ठाणेवैभव’च्या विविध क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीचा समाजमनावर सकारात्मक प्रभाव पडून एकोपा निर्माण होण्यास मदत होत आहे. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताणही कमी होत आहे, असे कौतुकोद्गार ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी काढले.
ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. क्रीडांगणावर खेळताना माणसाची वृत्ती सकारात्मक होते. आयुष्याच्या मैदानावरही खिलाडूवृत्ती जपा, असे आवाहन श्री.कराळे यांनी केले. यावेळी ऋतु ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद पटेल, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष डॉ.राजेश मढवी, ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, कसोटी पंच पिलू रिपोर्टर, टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबचे जनरल मॅनेजर डॉ.व्यंकट केशवन, कार्यवाहक आशिष सावंत, ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे, ठाणेवैभवचे कार्यकारी संपादक निखिल बल्लाळ उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय निखिल बल्लाळ यांनी करून दिला. स्पर्धा संघटक प्रल्हाद नाखवा यांनी सूत्रसंचालन केले.
आज सेंट्रल मैदान, ठाणे येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभापूर्वी क गटात टाईम्स ऑफ इंडिया विरुद्ध लार्सन अँड टुब्रो यांच्यात अंतिम लढत झाली. यात एल अँड टी संघ गट विजेता ठरला. तर मागील सामान्यांमध्ये अ गटात मफतलाल क्रिकेट क्लब गट विजेता तर ब गटात रूट मोबाईल संघ गट विजेता ठरला.
चौकट
अ गट विजेता: मफतलाल क्रिकेट क्लब
उपविजेता: डाटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस
उत्तम फलंदाज: हर्षित जनवाडकर (114, महेंद्र लॉजिस्टीक्स)
गोलंदाज: प्रसाद पाटील (3.5-0.26-4, मफतलाल)
अष्टपैलू: नुतन गोयल (166 धावा, 38 धावात 4 बळी, डाटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस)
विशेष उल्लेखनीय-पुनिल त्रिपाठी, मफतलाल
चौकट
ब गट विजेता: रुट मोबाईल
उपविजेता: डब्ल्यू एन.एस. ग्लोबल सर्व्हिसेस ‘अ’
उत्तम फलंदाज: शशिकांत कदम (नाबाद 77, रुट मोबाईल)
गोलंदाज-अमीत जाधव (4-0-12-4, मुंबई पोलीस ‘ब’)
अष्टपैलू: अथर्व डाकवे (52 धावा, 52 धावात 5 बळी, डब्ल्यू एन एस ग्लोबल सर्व्हिसेस ‘अ’)
विशेष उल्लेखलिय: सिमांत दुबे (8-0-41-5, अरुप्रित टायगर्स)
चौकट
क गट विजेता: लार्सन अॅण्ड टुब्रो
उपविजेता: टाइम्स ऑफ इंडिया
उत्तम फलंदाज: ज्ञानेश्वर पाटील (नाबाद 96, डब्ल्यू एन एस ग्लोबल सर्व्हिसेस ‘ब’)
गोलंदाज: पंकज सावंत (4-0-22-5, टाइम्स ऑफ इंडिया)
अष्टपैलू: कृपाप्रसाद अंबुरे (74 धावा 72 धावात 6 बळी, बी.एम.सी. सिक्युरीटी)
विशेष उल्लेखनीय: राकेश पुत्तन (127 धावा, 69 धावात 3 बळी, टाइम्स ऑफ इंडिया)