लोडशेडिंग रद्द करण्याची नगरसेवक कुणाल पाटील यांची महावितरणकडे मागणी
कल्याण : कल्याण पुर्वेतील मलंगगड भागात रात्रीच्या वेळी महावितरणकडून लोडशेडिंग केली जात आहे. यामुळे मलंगगड भागासह २७ गावांमध्ये रात्रीच्या अंधारात
चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे महावितरणकडून सुरु असलेली लोडशेडिंग तातडीने रद्द करण्याची मागणी नागरिकांनी के ली आहे. या संदर्भात कल्याण डोंबिवली महापालिके चेनगरसेवक कु णाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरि क ां च्या शिष्ट मं ड ळ ा ने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट
घेतली आहे.
महावितरणकडून सुरु असलेल्या रात्रींच्या लोडशेडिंग मुळे चोरटे ग्रामीण भागात सक्रिय झाले आहेत. वारंवार महावितरणला वीज पुरवठा रात्रीच्या वेळी खंडित करू नका, असे आवाहन नागरिकांकडून के लं जात आहे. मात्र असं असलं तरी सद्य परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि लग्नसराई, वारकरी सप्ताह ग्रामीण भागात सुरु
आहेत. असे असतानाही ग्रामीण भागात सुरु असलेली महावितरणची लोडशेडिंग सध्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कल्याण पूर्वेतील महावितरणच्या अभियंत्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीला महावितरणचे अधिकारी कसा प्रतिसाद देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. यावेळी द्वारली गावचे पोलीस पाटील चेतन पाटील, प्रशांत पाटील, हेमंत चिकनकर, मयांक पाटील यांसह परिसरातील ग्रामस्थ देखील उपस्थित होते.