कल्याण : सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष समारोप कार्यक्रमानिमित्त ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
१६० वर्षांची अखंडित वाचन परंपरा जपणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली वर्षभर जवळपास ३० च्यावर साहित्यिक उपक्रम राबविण्यात आले होते. सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केले आहे.