कंत्राटी पद्धतीने अग्निशमन दल चालवायला द्या

ठाण्यातील आगडोंब प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाडांचा संताप

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात भरती प्रक्रिया अजून झालेली नाही. अग्निशमन दल कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या, नाहीतरी आज सर्वच कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. पैसे खाण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत ठाण्यातील आगडोंब प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.

गावदेवी भाजी मार्केट येथे लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या अग्निशमन अधिकारी सागर शिंदे यांच्या पार्थिवाचे आव्हाड यांनी दर्शन घेतले. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलात भरती प्रक्रिया अजून झालेली नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. येथे माणस मृत्यूमुखी पडत आहेत. एक महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. यावेळी शहराध्यक्ष मनोज प्रधान, गटनेते अभिजित पवार उपस्थित होते.