केतकी चितळेच्या न्यायलयीन कोठडीत ७ जूनपर्यंत वाढ

ठाणे : सात जूनपर्यंत केतकी चितळे हिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण केल्यासंदर्भात केतकी चितळे हिने पोस्ट केली होती. त्याच पोस्ट संदर्भात 2020 रोजी ॲट्रॉसिटी गुन्हा तिच्यावर दाखल झाला होता.

याच गुन्ह्याबाबत रबाळे पोलिसांनी केतकी चितळे हिला अटक केली होती. आज तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर केतकी चितळेला रबाले पोलिसांनी ठाणे कोर्टात हजर केलं होतं. आज (24 मे) झालेल्या सुनावणीनंतर केतकी चितळे हीला आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

केतकी चितळे हिच्यावर राज्यभर गुन्हे दाखल आहेत. त्या बाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी केतकीचे वकील योगेश देशपांडे करणार आहेत. आजच्या झालेल्या सुनावणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. तसेच रबाळे पोलीस स्थानकात दाखल असलेल्या गुन्ह्यात संदर्भात म्हणजेच ॲट्रॉसिटी बाबत जामीन अर्जही करण्यात आल्याची माहिती देशपांडे यांनी दिला. या जामीन अर्जावरील युक्तिवाद उद्या (25 मे) होणार आहे.

आव्हाडांवर कारवाईची मागणी

ज्या पद्धतीने केतकी चितळे हिने पोस्ट केली होती त्याचप्रमाणे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील रिट्विट करत पोस्ट केलेली आहे, मग केतकी चितळेला एक न्याय आणि मंत्री महोदय यांना एक न्याय का? असा सवाल केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी विचारला आहे.