मुरबाड : यंदा आर्ट्स बिट्स फाउंडेशनच्या पुरस्कारावर मुरबाड तालुक्यातील गर्जा प्रतिष्ठानच्या तीन सदस्यांनी आपले नाव कोरले आहे. यात मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध कलाकार संतोष भांडे, प्रथमेश रोठे आणि राजेश काकडे यांचा समावेश आहे.
संतोष भांडे यांनी पथनाट्ये, नाटके, लघुचित्रपट, म्युजिक अल्बम, वेबसिरीज व चित्रपटांतील आपल्या विविधांगी भूमिकांतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. प्रथमेश रोठे व राजेंद्र काकडे यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षक वर्गावर अक्षरश गारुड केले आहे . अभिनय क्षेत्रातील त्यांचा उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.