जुनांदुर्खी-टेंभवली उपसरपंचपदी भाजपाच्या कल्पना घरत बिनविरोध

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील जुनांदूरखी-टेंभवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाच्या कल्पना घरत यांची रविवारी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे.
आपसात ठरल्याप्रमाणे माजी उपसरपंच कोमल शिकारी यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाच्या रिक्त पदासाठी कल्पना घरत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ग्रामविस्तार अधिकारी एकनाथ नारायण जाधव यांनी त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध नियुक्ती जाहीर केली.
निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. या निवडीनंतर कल्पना घरत यांनी ग्रामविकासाचा ध्यास मनी बाळगला आहे. यावेळी नारायण जाधव, नवनिर्वाचित सरपंच प्रेमनाथ भगत, माजी सरपंच भारती ठाकरे, महेंद्र पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून कल्पना घरत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.