डोंबिवलीत दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर चाकूने हल्ला; रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील आगरकर रोडवरील मन्ना गोल्ड ज्वेलर्सच्या दुकानात घुसून दुकानाचे मालक तारकनाथ मन्ना (५४) यांच्यावर एका अज्ञात मारेकऱ्याने चाकूने हल्ला केल्याची घटना7 मंगळवारी घडली आहे. या हल्ल्यात व्यापारी मन्ना हे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेचा रामनगर पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्याने दुकानातील कोणतीही वस्तू चोरुन नेली नसून  पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. डोंबिवली पूर्वेला आगरकर रोड परिसरात राहणारे  तारकनाथ मन्ना यांचे याच रोडवर मन्ना गोल्ड नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी ते दुकानात बसले असता अचानक एक मास्क घातलेला माणूस दुकानात आला. त्याने मन्ना यांना धारदार चाकू दाखवत चूप बैठो असे बोलत त्यांच्यावर वार करून पोबारा केला.

या घटनेचा रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबाबत रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व घटनेनंतर आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.