दहीहंडी उत्सवामुळे ठाण्यात चक्काजाम

ठाणे : शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये लावण्यात आलेल्या मोठ्या राजकीय हंड्यांमुळे आणि ठाणे-मुंबईतून उपस्थित राहणाऱ्या हजारो गोविंदांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

चिंतामणी चौक, टेंभी नाका, मासाहेब मीनाताई ठाकरे चौक, बाळकुम, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ, वर्तकनगर, श्रीनगर रोड क्र.२२, रघुनाथ नगर आदी बड्या दहीहंडीसह शहरात लहान-मोठ्या आयोजकांनी यंदा उत्सवाचा धूमधडाका लावला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होणार असून वाहतूक विभागाला नाकी नऊ येणार आहे.

संभावित वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पूर्व द्रुतगती महामार्ग, कोपरी ब्रिज, तीन हात नाका, धर्मवीर नगर नाका, नितीन कंपनी नाका, येथून ठाणे शहरात वंदना (वंदना बसस्टॉप स्टेशनच्या बाजूस) येणाऱ्या वाहनांना तसेच जाणाऱ्या वाहनांना या मार्गावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या सर्व वाहनांना कॅडबरी नाका, खोपट नाका, आंबेडकर रोडने जीपीओ नाक्याकडे तसेच गोल्डन डाइज नाक्यामार्गे मीनाताई ठाकरे चौककडून जीपीओ नाक्याकडून कोर्ट नाका, आंबेडकर पुतळा, जांभळी नाका, भाजी मार्केटमार्गे ठाणे पश्चिम बाजूकडे जातील.

सर्व गोविंदा पथकांच्या वाहनांना कोपरी ब्रिज नाका, तीनहात नाका, धर्मवीरनगर नाका, नितीन कंपनी नाका, कॅडबरी नाका येथून ठाणे शहराच्या अंतर्गत भागात तसेच स्टेशनच्या बाजूस जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदरची सर्व वाहने पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पार्किंग करता येणार आहे. ठाणे महापालिका भवन ते अल्मेडा चौक, महापालिका भवन ते ओपन हाऊस , ओपन हाऊस ते भक्तीमंदिर दरम्यान रस्त्यांच्य्या दोन्ही बाजूने पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे. टॉवर नाका ते गडकरी रंगायतन तसेच मासुंदा तलाव रोडवर दोन्ही बाजूने पार्किंगसाठी बंदी घालण्यात आली आहे.

उपवन, पवानगरकडून डॉ. काशिनाथ घाणेकर चौककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना त्यागराज बिल्डींग कट येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. सदरची वाहने त्यागराज बिल्डींग कट येथे उजवे बाजूस वळण घेवून वसंतविहार स्कूल सर्कल, वसंतविहार सर्कल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) मार्गे तुलशीधाम रोडने इच्छितस्थळी जातील. वसंत विहार सर्कल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौककडून डॉ. काशिनाथ घाणेकर चौक/पवार नगरकडे जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना लोकपुरम पब्लिक स्कूल कट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने वसंत विहार सर्कल (डॉ. आबासाहेब आंबेडकर चौक) येथून तुलशीधाम/वसंतविहार स्कुलमार्गे इच्छितस्थळी जातील.

खेवरा सर्कलकडून हिरानंदानी मिडास डॉ. काशिनाथ घाणेकर चौक पवारनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवसेना शाखा ४ समोर खेवरा सर्कल येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. सदरची वाहने खेवरा सर्कल येथून दोस्ती इम्पीरिया बिल्डींगमार्गे सर्व्हिस रोडने तुळशीधाम, वसंत विहार सर्कलमार्गे इच्छितस्थळी जातील.

जीपीओकडून कोर्टनाका मार्गे ठाणे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून क्रिक नाकामार्गे दादोजी कोंडदेव स्टेडियमकडून उजवीकडे वळण घेवून ए-वन फर्निचर मार्ग इच्छितस्थळी जातील. कळवा आणि साकेतमार्गे ठाणे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना उर्जिता हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने क्रिक नाकामार्गे डावीकडे वळण घेऊन दादोजी कोंडदेव स्टेडियमकडून उजवीकडे वळण घेवून ए-वन फर्निचरमार्गे इच्छितस्थळी जातील.

ठाणे रेल्वे स्टेशनकडून टॉवर नाका/टेंभीनाकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस व मोठी वाहने तसेच रिक्षा व चार चाकी लहान वाहने यांना मुस चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ठाणे रेल्वे स्टेशनकडून सेंटिस ब्रिजवरून येणाऱ्या एसटीच्या सर्व बसेस तसेच टीएमटीच्या सर्व बसेस या बी केबिनवरून सॅटिस ब्रिजवरून गोखले रोडमार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच रिक्षा व चार चाकी लहान वाहने सेंटिस ब्रिज खालून स्टेशन रोड मुस चौकमार्गे डावीकडे वळण घेऊन इच्छितस्थळी जातील.

साईमास हॉटेल/मोहनजी सुंदरजी मार्ग कडून संकल्प चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साईमास हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सर्व्हिस रोडने सरळ जाऊन एलआयसी ऑफिसकडून डावे वळण घेऊन इच्छितस्थळी जातील. जुना पासपोर्ट ऑफिसकडून संकल्प चौककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जिलानीवाडी, अर्जुना पार्क बिल्डींग येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने जिलानीव…