ठाणे : ‘पडेल तेंव्हा पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या जलशक्ती अभियानाची ‘जनजल चळवळ’ ग्रामीण भागात व्हावी यासाठी सर्वच यंत्रणानी काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी, असे मत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त करतानाच पुढील पंधरा दिवसात वस्तुनिष्ठ आणि शास्त्रोक्त पद्धतीने ‘गाव पाऊस पाणी आराखडा’ तयार करण्याचे निर्देशही दिले.
सोमवारी या अभियानाबाबत ऑनलाईन कार्यशाळा झाली. त्यावेळी श्री. नार्वेकर बोलत होते. ते म्हणाले की, शासनाचे हे महत्त्वाकांक्षी अभियान असून आपल्या सर्वाना मिळून जिल्हात हे अभियान यशस्वी करायचे आहे. त्यासाठी तयार करण्यात येणारा आराखडा हा दिशादर्शक बनवायचा आहे. या आराखड्यात नमूद असणारी जलसंधारणाची कामे करून गावात जास्तीत जास्त पावसाचे पाणी साठून राहील यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी आवर्जून नमूद के ले. या अभियानात शिक्षक, बचत गट, युवकवर्ग, गावकरी या सगळ्यांना सोबत घेऊन प्रशासन आणि गावकरी यांच्या समन्वयातून हा आराखडा तयार करावा असेही त्यांनी यंत्रणाना स्पष्ट के ले. या कार्यशाळेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी देखील हे अभियान यशस्वी होण्यासाठी जन सहभाग महत्वाचे असल्याचे अधोरेखित के ले. मुख्य म्हणजे डॉ. दांगडे यांनी या अभियानासाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसली तरी विविध माध्यमांतून कशा प्रकारे निधी उपलब्ध करायचा याविषयीची अधिक माहिती सांगितली. त्याचबरोबर २४ एप्रिल रोजी ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत आराखडा मंजूर करण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेत पाणी पुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी जलशक्ती अभियानाच्या उद्देशाबाबत सविस्तरपणे माहिती दिली तर ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी या अभियानात ग्रामपंचायत विभागाची भूमिका काय आहे आणि त्यानुसार गावपातळीवर कशाप्रकारे अंमलबजावणी करायला हवी याबाबत सखोल मार्गदर्शन के ले. जलसंधारणाचे विविध उपचार याविषयावर जिल्हा जलसंधारण अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. गायकवाड यांनी सादरीकरण के ले. तर ‘पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोतांचे पुनर्भरण’ या विषयावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांनी सादरीकरण
के ले. ‘पाणलोटक्षेत्र विकास व वृक्षलागवड’ या विषयावर सामाजिक वनीकरण अधिकारी कांचन पवार यांनी मार्गदर्शन के ले तर ‘मनरेगा’ विषयी उप जिल्हाधिकारी
दीपक चव्हाण यांनी माहिती दिली. ‘कृषी विभागाची भूमिका’ या विषयावर जिल्हा अधीक्षक कृषि मोहन वाघ यांनी मार्गदर्शन के ले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, सर्व पंचायत समिती गट विकास अधिकारी, ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि मोठ्या संख्येने सरपंच उपस्थित होते.
जलशक्ती मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने या वर्षी राज्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हातील ४३१
ग्रामपंचायतमध्ये या अभियानाची काटेकोरपणे अमलबजावणी होण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फ त प्रयत्न के ले जाणार आहेत.