ठाणे : महाअंतिम सोहळ्यामध्ये जय आणि विशाल निकम यांच्यात अटीतटींचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. बिग बॉस मराठी ३च्या ग्रँड फिनालेमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाणेकर जय दुधाणेला घेऊन चित्रपट करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
या चित्रपटाचं नाव ‘शनिवारवाडा’ असेल असं त्यांनी सांगितलं. मांजरेकरांच्या या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. जय एक उद्योगपती आहे व त्याला महागड्या चारचाकी गाडींचा शोक आहे. यासोबतच त्याला फिटनेसची देखील आवड आहे.