डोंबिवली: डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान आयटीआयच्या विद्यार्थ्याचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आयुष दोषी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयुष हा आयटीआयचा विद्यार्थी होता. आयुषच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा पुढील तपास डोंबिवली जीआरपी पोलिसांनी सुरू केला आहे. 20 वर्षीय आयुष हा आपल्या कुटुंबासह डोंबिवली पश्चिम सम्राट चौक येथे राहत होता. मुलुंड येथे आयुष हा आयटीआय शिकत होता. आज आयुषने नेहमीप्रमाणे सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने जाणारी 8 वाजून 15 मिनिटांची फास्ट लोकल पकडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळे लोकलमध्ये आत शिरण्यास जागाच मिळाली नसल्याने तो दरवाजावर उभा होता. मात्र याचदरम्यान त्याचा तोल गेल्याने लोकलमधून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.