आयपीएल स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० लीग आहे. इंडियन प्रीमियर लीगचं १५ वं पर्व आजपासून सुरू होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज नव्या नेतृत्वासह मैदानात उतरणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व युवा भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरकडे असेल, तर चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे असेल. गेल्या पर्वात अंतिम सामना या दोन संघांमध्ये झाला होता.हा सामना चेन्नईने जिंकत विजेतेपद पटकावले होते. चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा जेतेपद मिळवून देणारा कॅप्टन माही अर्थात महेंद्रसिंह धोनीने अचानकपणे चेन्नईचे कर्णधारपद सोडले. धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद रविंद्र जाडेजाकडे सोपवले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज – रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉन्वे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महीष तीक्ष्णा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग.

कोलकाता नाइट रायडर्स – आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरिन, पॅट कमिन्स, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, रसिक दार, बाबा इंद्रजित, चमिका करुणारत्ने, अभिजित तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, सॅम बिलिंग्ज, ऍलेक्स हेल्स, टिम साऊदी, रमेश कुमार, उमेश यादव, मोहम्मद नबी, अमन खान.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, तिलक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन एलन.

दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एन्रिच नॉर्किया, डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एनगिडी, टिम सेफर्ट, विकी ओस्तवाल.

पंजाब किंग्ज – मयंक अगरवाल (कर्णधार), अर्शदीप सिंग, शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चाहर, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, वृत्तीक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल.

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुर्वेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद मॅकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण सेन, ध्रुव जुरेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जिमी नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, रासी व्हॅन डर डुसेन, डॅरिल मिशेल.

सनरायझर्स हैदराबाद – केन विलियमसन (कर्णधार), अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जे सुचिथ, एडेन मार्करम, मार्को जॅन्सेन, रोमॅरियो शेफर्ड, सीन एबॉट, रविकुमार समर्थ, शशांक सिंग, सौरभ दुबे, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारुकी.

गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कर्णधार), राशिद खान, शुबमन गिल, मोहम्मद शमी, जेसन रॉय, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर साई किशोर, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झार जोसेफ, प्रदीप सांगवान, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकीरत सिंग, वरुण आरोन, बी साई सुदर्शन.

लखनऊ सुपरजायंट्स – केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्क वुड, आवेश खान, अंकित राजपूत, के गॉथम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहसिन खान, आयुष बडोनी, काइल मेयर्स, करण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभूदेसाई, चमा मिलिंद, अनिश्‍वर गौतम, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, लवनीथ सिसोदिया, डेव्हिड विली.