कल्याणमध्ये पार पडली आंतर महाविद्यालयीन विद्यार्थी इतिहास परिषद

कल्याण : कल्याण बंदर परिसरातून सातवाहन काळापासून संपूर्ण भारत देशाचा व्यापार चालत होता. तेव्हा कल्याण हे जागतिक पातळीवरिल बंदर होते. तेव्हा पासून कल्याणच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीवर डॉ. श्रीनिवास साठे यांनी प्रकाश टाकला. शेठ हिराचंद मुथा कॉलेज आणि कोकण इतिहास परिषद कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन विद्यार्थी इतिहास परिषदेसाठी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक संतोष दराडे, कोकण इतिहास परिषद कल्याण अध्यक्ष डॉ.  जितेंद्र भामरे, मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा, प्राचार्या अनुजा ब्रह्मा, प्रा सुनील सूर्यराव, प्रा विनिता हुबळीकर उपस्थित होते. नुकतेच 2023 लां एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या दगडे यांनी त्यांचे अनेक अनुभव विद्यार्थ्यांसमोर व्यक्त करून गिर्यारोहण क्षेत्रातही करिअर चया उत्तम संधी उपलब्ध आहेत.  त्याचा लाभ घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांना केली.

दुसऱ्या सत्रात इतिहास परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भामरे यांनी कल्याणच्या प्राचीन इतिहास याबाबत तसेच चुकीचा इतिहास कसा पसरत गेला हे सांगून खरा इतिहास शोधण्याची गरज असून कल्याण मधील अनेक वस्तूंचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अश्या परिषदा मधून, त्याच्या अभ्यासातून नव्या जुन्या गोष्टी शोधण्याची वृत्ती निर्माण होते.  त्याचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे असे मत यावेळी प्रा सुनील सूर्यराव यांनी व्यक्त केले. दिवसभर चाललेल्या या परिषदेमध्ये अनेक महाविद्यालय मधील विद्यार्थी सहभागी झाले होते.