पाकिस्तानात घुसून मारले; ७० अतिरेक्यांचा खात्मा!

* पहलगाम हल्ल्याचा भारताने घेतला बदला
* मध्यरात्री फक्त २५ मिनिटांत ऑपरेशन सिन्दुर यशस्वी

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यात २८ कुटुंबांच्या घरातील कर्त्या पुरुषांना धर्म विचारून गोळ्या घालून ठार मारले. या घटनेचा बदला आज भारतीय सेनेने ऑपरेशन सिन्दुर ही मोहीम राबवत घेतला. काल ६ मे रोजी मध्यरात्री दीड वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात १०० किमी आत घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या या एअर स्ट्राइकमध्ये शेकडो दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. भारतात अनेक हल्ले करून निष्पापांचे बळी घेणाऱ्या मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब मारले गेले तर जैश, तोयबा आदी संघटनांचे सहाहून अधिक म्होरके ठार झाले आहेत.

मागील १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाले तर देशातही सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर भारतीय सेनेच्या नौसेना, वायू सेना आणि थल सेनेच्या प्रमुखांची बैठक घेत पुढची रणनीती ठरवली आणि अखेर संरक्षण सचिव अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिन्दुर ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत राफेल विमानांसह अत्याधुनिक ड्रोन आणि स्काल्पसारखी अचूक वेध घेणारी क्षेपणास्त्रे वापरण्यात आली. त्यामुळे वायुसेनेला पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानात १०० किमी आत घुसून दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हल्ला करत ते उद्ध्वस्त केले.

बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय असून आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर आहे. मुरीदके येथे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय असून ते सीमेपासून 30 किमी अंतरावर आहे. सवाईनाला येथे लश्कर-ए-तोयबाचा अड्डा असून ते सीमेपासून 30 कि.मी.दूर आहे. गुलपूर येथे दहशतवाद्यांचा अड्डा असून तो ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर आहे. हल्ल्यावेळी येथे ८० दहशतवादी होते. बिलाल येथे जैश-ए-मोहम्मदचा हवाई तळ असून सीमेपासून 35 कि.मी.दूर आहे. कोटली येथे नियंत्रण रेषेपासून १५ किमी अंतरावर आहे. हल्ल्यावेळी तेथे ५० दहशतवादी उपस्थित होते. बरनाला येथे दहशतवाद्यांचा अड्डा सीमारेषेपासून १० कि.मी.दूर आहे. सरजाल येथील जैश-ए-मोहम्मदचा अड्डा सीमेपासून आठ कि.मी.दूर आहे. महमूना येथे हिजबुल्लाचे प्रशिक्षण केंद्र सीमेपासून १५ कि.मी. दूर आहे. या नऊ तळांवर वायू सेनेच्या विंग कमांडर्सनी मिसाईल सोडत ही तळ उद्ध्वस्त केले.

ऑपरेशन सिंदूर’ची वैशिष्ट्ये म्हणजे पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला करण्यात आला. भारताने दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकने कबुलीही दिली. पाकव्याप्त काश्मीरचं नव्हे तर पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त करण्यात आले. हल्ल्यापूर्वी दहशतवादी अड्ड्यांची अचूक माहिती गुप्तहेरांकडून मिळवण्यात आली होती. भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजा झाली नाही.

पाकिस्तानमधील नऊ तळ बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचा वापर करण्यात आला. राफेल विमानांनी लक्ष्यांवर स्काल्प क्षेपणास्त्र डागली. ५०० किमी अंतरावरील लक्ष्यांचा मारा करण्याची स्काल्पची क्षमता आहे. तर एक हजार किमी प्रतितास वेगाने स्काल्प मिसाईल मारा करते. शत्रूच्या रडारवर स्काल्प दिसत नसल्याने हा हल्ला यशस्वी झाला.

ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय सैन्याने दिलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. भारतीय लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची सगळी माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा पुराव्यांसह बुरखा फाडला. लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेबाबत माहिती देताना सांगितलं की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार जवानांची हत्या करण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी टार्गेट असलेली आणि ती ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील दाखवले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते.

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये कोण झाले ठार?

लष्कर ए तय्यबाचा महत्वाचा कमांडर खालिद मोहम्मद आलम

धर्मांध इस्लामिक धर्मप्रसारक आणि कोटली दहशतवादी शिबिराचा मुख्य कमांडर कारी मोहम्मद इकबाल

हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगर गंभीररित्या जखमी

मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरच्या पत्नीचा मृत्यू

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा मृत्यू

याशिवाय मौलाना मसूद अजहर याच्या परिवारातील एकूण १४ लोकांचा मृत्यू

लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी वकास आणि हसन यांनाही कंठस्नान

लष्कर ए तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल मलिक आणि मुदस्सिर यांचा खात्मा