ठाणे : शहरातील कोरोना रूग्ण वाढीचा आकडा कमी झाला असून आज ३८ नवीन रुग्णांची भर पडली. सुदैवाने आज एकही मृत्यू झाला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी ५३ जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९०,२४९ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ३५९जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१४२जण दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ८५८ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ३८जण बाधित मिळाले. आत्तापर्यंत २४ लाख ८३,४४८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९२,७५०रूग्ण बाधित सापडले आहेत.