दुसऱ्या टी-20 मध्ये पाच विकेट्सने (डीएलएस पद्धत) जोरदार विजय मिळविल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेच्या मनात तिसरा सामना जिंकून मालिकेवर शिक्कामोर्तब करायची इच्छा असेल. दुसरीकडे, भारत अधिक चांगले प्रदर्शन करून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाईल.
संघ
दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, ब्रिटजकी, ट्रिस्टन स्टब्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, अँडीले फेहलुक्वायो, केशव महाराज, जेरल्ड कोएत्झी, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी, ओटनीएल बार्टमन, मार्को यानसन, डोनोवन फरेरा, लिझाद विल्यम्स
भारत: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दीपक चहर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, इशान किशन, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, कुलदीप यादव
भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-20 क्रिकेटमध्ये आमने सामने
भारत आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध 25 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात भारताने 13 जिंकले आहेत, दक्षिण आफ्रिकेने 11 जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. दक्षिण आफ्रिकेत, त्यांनी आठ टी-20 सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने पाच आणि दक्षिण आफ्रिकेने तीन जिंकले आहेत.
भारत | दक्षिण आफ्रिका | |
आयसीसी टी-20 रँकिंग | 1 | 6 |
टी-20 क्रिकेटमध्ये आमने सामने | 13 | 11 |
दक्षिण आफ्रिकेत | 5 | 3 |
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे?
सूर्यकुमार यादव: भारतीय कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 36 चेंडूत 56 धावा केल्या. भारताने दोन षटकांत दोन गाडी गमावले होते जेव्हा सूर्यकुमार फलनादजी करायला मैदानावर उतरला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या या टी-20 फलंदाजाने सर्व दबाव झुगारून त्याचे 17वे टी-20 अर्धशतक झळकावले. त्याने चौथ्या विकेटसाठी रिंकू सिंगसोबत 70 धावांची उपयुक्त भागीदारी केली.
मुकेश कुमार: भारताचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याने तीन षटकांत दोन गडी बाद केले. त्याने जरी 34 धावा लुटल्या असल्या तरी त्याच्या नावावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम आणि जोरदार फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड मिलर यांचे महत्वाचे विकेट्स होते.
रीझा हेंड्रिक्स: दक्षिण आफ्रिकेच्या उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 27 चेंडूत 49 धावा करत धावांचा पाठलाग करताना आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याचा डाव आठ चौकार आणि एका षटकाराने सजला होता. 180 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह, त्याने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला.
जेराल्ड कोएत्झी: आपला चौथा टी-20 खेळताना, दक्षिण आफ्रिकेच्या या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये चेंडूने कामगिरी केली. पॉवरप्लेच्या आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करत त्याने 3.3 षटकांत ३२ धावा देऊन तीन विकेट्स पटकावल्या.
खेळपट्टी आणि परिस्थिती
या ठिकाणी आजपर्यंत 10 आंतरराष्ट्रीय पुरुष टी-20 सामने आयोजित केले आहेत. 10 सामन्यांपैकी दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी सात सामने जिंकले आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 158 आहे आणि दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 143 आहे. येथे नोंदवलेले सर्वोच्च धावसंख्या 236 आणि सर्वात कमी 98 आहे. फलंदाजीसाठी परिस्थिती चांगली असल्याने उच्च धावसंख्येची स्पर्धा अपेक्षित आहे. वेगवान गोलंदाजांना काही अतिरिक्त वेग आणि उसळी देणाऱ्या खेळपट्टीवर मदत मिळू शकते.
हवामान
सकाळच्या वेळेस हवामानात गारवा असण्याची शक्यता आहे. थोडेसे ढग आणि सूर्यप्रकाशासह दिवसभर वातावरण छान असेल. दिवसाचे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. ६५% ढगांचे आच्छादन आणि ३% पावसाची शक्यता असेल. उत्तर-वायव्येकडून वारे वाहतील.
माइलस्टोन अलर्ट
अँडिले फेहलुकवायोला 50 आंतरराष्ट्रीय टी-20 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 5 विकेट्सची गरज आहे
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १४ डिसेंबर २०२३
स्थळ: न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
वेळ: रात्री 8.30 वाजता
प्रसारण: डिस्ने+हॉटस्टार अॅप, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क