न्यूझीलंडकडून २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा बदला भारत २०२३ मध्ये घेऊ शकेल?

Photo credits: X/AP

२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताचा अवघ्या १८ धावांनी पराभव झाला तेव्हा एक अब्जाहून अधिक हृदये दुखावली. दोन दिवसीय सामना (होय, तुम्ही ते बरोबर वाचले) मोठ्या निराशेने संपले कारण भारत न्यूझीलंडने ठेवलेला लक्ष्य सध्या करू शकले नाही. चार वर्षांनंतर, भारत त्या पराभवाचा बदला घेऊन १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत करू शकेल का?

भारत आणि न्यूझीलंडमध्ये, २०१९ विश्वचषकापासून, १० एकदिवसीय सामने खेळले गेले, ज्यामध्ये भारताने पहिले चार गमावले आणि शेवटचे चार जिंकले (दोन सामन्यांचा निकाल लागला नाही). या विश्वचषकातील भारताचा अप्रतिम फॉर्म पाहता, त्यांच्याकडे उपांत्य फेरी जिंकणायची आणि फायनल मध्ये आपली जागा पक्की करण्याची उत्तम संधी आहे.

 

भारत आणि न्यूझीलंड एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

भारत आणि न्यूझीलंड यांनी १९७५ पासून एकमेकांविरुद्ध ११७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने ५९ जिंकले आहेत, न्यूझीलंडने ५० जिंकले आहेत, एक सामना टाय झाला आणि सात सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी एकमेकांविरुद्ध ३९ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने ३० जिंकले आहेत, न्यूझीलंडने आठ जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. विश्वचषकात, ते नऊ वेळा भेटले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडने ५-४ ने आघाडी घेतली आहे. विश्वचषकाच्या या आवृत्तीत मात्र भारताने किवीजचा चार विकेट्स राखून पराभव करत विजय मिळवला.

  भारत न्यूझीलंड
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने ५९ ५०
भारतात ३०
विश्वचषकात

 

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील भारत आणि न्यूझीलंडची आतापर्यंतची कामगिरी

या विश्वचषकातील भारत आणि न्यूझीलंडच्या कामगिरीची तुलना केल्यास, किवींच्या तुलनेत भारताची कामगिरी जास्ती चांगली झाली यात शंका नाही. यजमानांनी लीग टप्प्यात एकही सामना गमावला नाही आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, २०१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळलेल्या न्यूझीलंडने चढ-उतार पाहिले. त्यांनी सलग चार सामने जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले. त्यांनी श्रीलंकेला शेवटच्या साखळी सामन्यात हरवून शेवट मात्र गोड केली.

 

सामना क्रमांक भारत न्यूझीलंड
ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव
अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव नेदरलँड्सचा ९९ धावांनी पराभव
पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव
बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव अफगाणिस्तानचा १४९ धावांनी पराभव
न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव भारताकडून ४ विकेटने पराभव
इंग्लंडचा १०० धावांनी पराभव ऑस्ट्रेलियाकडून ५ धावांनी पराभव
श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव दक्षिण आफ्रिकेकडून १९० धावांनी पराभव
दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव पाकिस्तानकडून २१ धावांनी पराभव (डीएलएस प्रणाली)
नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव श्रीलंकेचा ५ विकेटने पराभव

 

संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, प्रसिध कृष्णा.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.

 

दुखापती अपडेट्स                            

उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी भारत आणि न्यूझीलंडला दुखापतीची चिंता नाही.

 

खेळण्याची परिस्थिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील पाचवा आणि शेवटचा सामना हे ठिकाण आयोजित करेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे खेळल्या गेलेल्या चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. या विश्वचषकात भारताने येथे एक सामना खेळला आहे. श्रीलंकेविरुद्ध ३०२ धावांनी विजय मिळवला होता. पहिल्या डावात फलंदाजी करणे तुलनेने सोपे आहे. दुसऱ्या डावात, फ्लडलाइट्स चालू असताना, गोलंदाजांना थोडी मदत मिळते. तसेच, दुसऱ्या हाफमध्ये स्टेडिअममध्ये वाहणाऱ्या मंद वाऱ्यामुळे गोलंदाजांना स्विंग मिळण्यास मदत होते.

 

हवामान

धुके सूर्यप्रकाशासह हवामान खूप उबदार राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. २१% ढगांचे आच्छादन आणि १% पावसाची शक्यता असेल. दक्षिण-नैऋत्येकडून वारे वाहतील.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

विराट कोहली: या विश्वचषकात अविश्वसनीय ९९ च्या सरासरीने, भारताच्या विराट ‘किंग’ कोहलीने नऊ सामन्यांमध्ये ८९ च्या स्ट्राइक रेटने ५९४ धावा केल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या सामन्यात, त्याने तीन षटके टाकण्यासाठी हात फिरवला आणि एक विकेट देखील घेतली.

जसप्रीत बुमराह: न खेळता येणारे यॉर्कर फेकण्याची कला या भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये आहे. त्याने नऊ सामन्यांमध्ये १७ बळी घेतले आहेत आणि तो त्याच्या संघासाठी आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज आहे. नवीन चेंडूने तो उत्तम गोलंदाजी तर करतोच पण अंतिम षटकांत सुद्धा त्याची कामगिरी लक्षणीय आहे.

रचिन रवींद्र: या २३ वर्षीय न्यूझीलंडच्या खेळाडूसाठी हा विश्वचषक एका स्वप्नासारखा उलगडला आहे. नऊ सामन्यांमध्ये ७१ च्या सरासरीने आणि १०८ च्या स्ट्राइक रेटने ५६५ धावा करून, त्याने ‘डेब्यू’ विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या आहेत.

मिचेल सँटनर: न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज नऊ सामन्यांत १६ बळी घेऊन त्याच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजीची इकॉनॉमी प्रति षटक पाच धावांहून कमी आहे.

 

 

आकड्यांचा खेळ

मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव त्यांचा १०० वा वनडे खेळणार आहेत.

  • मोहम्मद शमीला विश्वचषकात ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची गरज आहे
  • जसप्रीत बुमराहला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ४ विकेट्सची गरज आहे
  • विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतके पूर्ण करण्यासाठी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनण्यासाठी १ शतक आवश्यक आहे
  • रोहित शर्माला विश्वचषकात १५०० धावा पूर्ण करण्यासाठी १९ धावांची गरज आहे
  • टॉम लॅथमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करण्यासाठी ४८ धावांची गरज आहे
  • डॅरिल मिशेलला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ५७ धावांची गरज आहे
  • लॉकी फर्ग्युसनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेटची आवश्यकता आहे

 

 

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख:  १५ नोव्हेंबर २०२३

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: वानखेडे स्टेडियम, मुंबई

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)