आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा २१ वा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या विश्वचषकात दोन्ही संघांनी पहिले चार सामने जिंकले आहेत. तथापि, या सामन्याच्या शेवटी, एक संघ दुसर्याची अविश्वसनीय विजयाची मालिका खंडित करेल.
भारत आणि न्यूझीलंड एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
भारत आणि न्यूझीलंड यांनी १९७५ पासून एकमेकांविरुद्ध ११६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने ५८ जिंकले आहेत, न्यूझीलंडने ५० जिंकले आहेत, एक सामना टाय झाला आहे आणि सात सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात, या दोन संघांनी एकमेकांविरुद्ध ३८ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने २९ तर न्यूझीलंडने आठ जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. विश्वचषकात न्यूझीलंडची भारताविरुद्ध ५-३ अशी आघाडी आहे.
भारत | न्यूझीलंड | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | १ | ५ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विजय) | ५८ | ५० |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (भारतात) | २९ | ८ |
विश्वचषकात (विजय) | ३ | ५ |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील भारत आणि न्यूझीलंडची आतापर्यंतची कामगिरी
भारत आणि न्यूझीलंड आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला पाचवा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांनी त्यांचे मागील सर्व चार सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडने धावसंख्येचा पाठलाग करताना आणि बचाव करताना दोन-दोन सामने जिंकले आहेत, तर भारताला लक्ष्याचा बचाव करण्याच्या क्षमतेची चाचणी करण्याची संधी मिळालेली नाही.
सामना क्रमांक | भारत | न्यूझीलंड |
१ | ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव | इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव |
२ | अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव | नेदरलँड्सचा ९९ धावांनी पराभव |
३ | पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव | बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव |
४ | बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव | अफगाणिस्तानचा १४९ धावांनी पराभव |
संघ
भारत: रोहित शर्मा (क), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (क), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग .
दुखापती अपडेट्स
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या घोट्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध खेळू शकणार नाही. १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना त्याला ही दुखापत झाली होती. न्यूझीलंडसाठी, त्यांचा नियमित कर्णधार केन विल्यमसन भारताच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. १३ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला थ्रो लागल्याने तो फ्रॅक्चर झाला. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करेल.*
खेळण्याची परिस्थिती
धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. २०१६ मध्ये, हे दोन संघ येथे एकमेकांविरुद्ध खेळले होते, भारताने तो सामना ६ गडी राखून जिंकला होता.
या स्पर्धेतील चौथा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. मागील तीन सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी दोन आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी एक विजय मिळवला आहे. ढगाळ वातावरणाची शक्यता असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना काही मदत मिळू शकते. त्याचबरोबर फलंदाजीसाठी खेळपट्टी अनुकूल असेल.
हवामान
हवामान थंड राहण्याची अपेक्षा आहे. दुपारी गडगडाटी वादळे होऊ शकतात. दिवसभरात कमाल तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. ७१% ढगांचे आच्छादन असेल. पावसाची ४३% आणि गडगडाटी वादळाची २६% शक्यता आहे. वायव्येकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
५४० एकदिवसीय सामने आणि त्यात २३००० हून अधिक धावांसह, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली सर्वांचे लक्ष वेधून घेतील. या विश्वचषकात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या मागील चार सामन्यांमध्ये रोहितने ६६ च्या सरासरीने आणि १३७ च्या स्ट्राइक रेटने २६५ धावा केल्या आहेत, तर कोहलीने १३० च्या सरासरीने आणि ९० च्या स्ट्राईक रेटने २५९ धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने चार सामन्यांमध्ये १० विकेट्स घेऊन उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज डेव्हॉन कॉनवे कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने गेल्या चार सामन्यांमध्ये ८३ च्या सरासरीने आणि १०५ च्या स्ट्राईक रेटने २४९ धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांनी या विश्वचषकात आतापर्यंत आपल्या आक्रमक गोलंदाजीने विरोधी संघांना खूप त्रास दिला आहे. सँटनरने चार सामन्यांत ११ बळी घेतले आहेत, तर हेन्रीने नऊ बळी घेतले आहेत.

आकड्यांचा खेळ
- सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या (४९) विक्रमाशी बरोबरी करण्यापासून विराट कोहली एक शतक दूर
- केएल राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यापासून ५९ धावा दूर
- शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यापासून १४ धावा दूर
- ट्रेंट बोल्टला विश्वचषकात ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ६ विकेट्सची गरज
- टॉम लॅथमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करण्यासाठी ८२ धावांची गरज
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: २२ ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)