भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बरोबरी करेल?

Photo credits: AFP

बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत निराशाजनक सुरुवात केल्यानंतर, पहिला सामना 38 धावांनी गमावलेल्या भारतीय महिला, मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आणि ती जिवंत ठेवण्यासाठी आणखी जोर लावतील.

भारत आणि इंग्लंड महिला यांच्यातील दुसरा टी-२० सामना ९ डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

 

 संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.

इंग्लंड: हेदर नाइट (कर्णधार), लॉरेन बेल, माईया बौचियर, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एकलस्टन, महिका गौर, डॅनियल गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ, एमी जोन्स, फ्रेया केम्प, नॅट सिव्हर-ब्रंट, डॅनियल वायट.

 

टी२० क्रिकेट मध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने

भारत आणि इंग्लंड यांच्यात 28 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी भारताने सात जिंकले आहेत आणि इंग्लंडने 21 जिंकले आहेत. भारतात त्यांनी 10 टी-20 सामने खेळले असून, भारताने दोन आणि इंग्लंडने आठ जिंकले आहेत.       

  भारत  इंग्लंड
आयसीसी टी-20 रँकिंग 4 2
टी-20 क्रिकेट मध्ये आमने सामने 7 21
भारतात 2 8

 

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

नॅट स्किव्हर-ब्रंट: इंग्लंडच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पहिल्या टी-२० मध्ये सामनावीर पुरस्कार जिंकला. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 53 चेंडूत 77 धावा केल्या आणि चार षटकांत ३५ धावा देऊन एक गडी बाद केला.

सोफी एकलस्टन: जगातील नंबर 1 महिला टी-२० बॉलर पहिल्या टी-२० मध्ये इंग्लंडसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली कारण तिने चार षटकात 1 १५ धावा देऊन तीन विकेट्स पटकावल्या ज्यात शफाली वर्मा आणि भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा समावेश होता.

शफाली वर्मा: भारताची उजव्या हाताची सलामीची फलंदाज तिच्या संघासाठी पहिल्या टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारी होती. तिने धावांचा पाठलाग करताना 42 चेंडूत 52 धावा ठोकल्या. 17 व्या षटकापर्यंत तिने लढत दिली.

रेणुका सिंग ठाकूर: भारताच्या या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या टी-२० च्या पहिल्या षटकात दोन विकेट्स घेऊन धमाकेदार सुरुवात करून दिली. तिच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये तिने २७ धावा देऊन तीन गडी बाद केले.

 

खेळपट्टी

या मैदानावर होणारा हा मालिकेतील दुसरा सामना असेल. शेवटच्या सामन्यात 350 हून अधिक धावा झाल्या. आणखी एक उच्च स्कोअरिंग स्पर्धेची अपेक्षा करा कारण परिस्थिती फलंदाजीसाठी उत्कृष्ट आहे. नवीन चेंडूवर वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळू शकते, पण फलंदाजांनाची बॅट जास्ती आवाज करेल.

 

हवामान

हवामान उबदार राहण्याची अपेक्षा आहे. तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. 22% ढगांचे आच्छादन असेल आणि पावसाची शक्यता नाही. उत्तर-ईशान्येकडून वारे वाहतील.

 

माइलस्टोन्स अलर्ट

  • स्मृती मंधानाला 3000 T20I धावा पूर्ण करण्यासाठी 60 धावांची गरज आहे
  • दीप्ती शर्मा तिची 100वी आंतरराष्ट्रीय टी-२० खेळणार आहे आणि तिला 1000 टी-२० धावा पूर्ण करण्यासाठी 41 धावांची गरज आहे

 

सामनापूर्व पत्रकार परिषदेत ते काय म्हणाले

हरमनप्रीत कौर: “स्पिन ही अशी गोष्ट आहे जी नेहमीच आमची ताकद राहिली आहे. मी आमच्या वेगवान गोलंदाजांकडे पाहिले तर रेणुका खरोखर चांगली कामगिरी करत आहे आणि दुसऱ्या टोकाला पूजा तिला मदत करत आहे. संघातील इतर वेगवान गोलंदाजांचा विचार करताना तितासचं नाव समोर येतं. तिची तब्येत बारी नसल्यामुळे ती मागील सामना खेळू शकली नाही. आज तिने नेटमध्ये गोलंदाजी केली. आशा आहे की ती पुढच्या सामन्यासाठी तयार असेल. फिरकीपटूंकडे परत जाताना मला वाटते की त्यांनी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना निवडले आहे.”

एमी जोन्स: “ग्लेनी [सारा ग्लेन] आणि सोफ [सोफी एक्लेस्टोन] यांनी [पहिल्या टी-२० मध्ये] खरोखरच चांगली गोलंदाजी केली. त्यांना सगळं सोपे ठेवायला आवडते. ते शक्य तितक्या स्टंपवर हल्ला करू पाहतात. जर विकेट त्यांना टर्न देत असेल तर तो एक बोनस आहे आणि जर नसेल तर ते टाईट [लाईन आणि लेन्थ] ठेवण्यात ते खरोखर चांगले आहेत.”