भारतासमोर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बरोबरी करण्याचे आव्हान

Photo Credit: EMMANUAL YOGINI

गुरुवारी भारतीय महिला क्रिकेट संघानी ५० षटकात २८२ धावा करून ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्ध त्यांची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. स्कोरबोर्डवर अशी दमदार धावसंख्या असूनही, भारतीय गोलंदाजांना त्याचा बचाव करता आला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिला एकदिवसीय सामना २१ चेंडू शिल्लक ठेवून सहा विकेट्सने जिंकला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधीही एकदिवसीय मालिका न जिंकलेला भारत, शनिवारी, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुसरा सामना खेळताना सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, स्नेह राणा, हरलीन देओल

ऑस्ट्रेलिया: एलिसा हिली (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, जेस जोनासन, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी , मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम

 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

भारत आणि ऑस्ट्रेलियाने एकमेकांविरुद्ध ५१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी ऑस्ट्रेलियाने ४१ जिंकले आहेत, तर भारत फक्त १० जिंकू शकला आहे. भारतातही ऑस्ट्रेलियाने २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८ विजयांसह वर्चस्व राखले आहे. अलीकडच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर, गेल्या पाच सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर चार विजय मिळवले आहेत.

  भारत ऑस्ट्रेलिया
आयसीसी एकदिवसीय रँकिंग
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने १० ४१
भारतात १८
शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

जेमिमाह रॉड्रिग्स: मुंबईच्या या २३ वर्षीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांसाठी सर्वाधिक धावा केल्या. १३ व्या षटकात भारताने जेव्हा ५७ धावांवर तीन विकेट्स गमावल्या होत्या तेव्हा ते बऱ्याच दडपणाखाली होते. त्यावेळी ही उजव्या हाताची फलंदाज खेळायला आली आणि सर्व दबाव स्पंजप्रमाणे शोषून घेतला. तिने तिचे पाचवे एकदिवसीय अर्धशतक ठोकले. तिने ७७ चेंडूत ८२ धावा केल्या. तिच्या डावात सात चौकारांचा समावेश होता. तिने एकही षटकार मारला नाही आणि जोखीममुक्त क्रिकेट खेळायचा प्रयत्न केला.

पूजा वस्त्राकर: नवव्या क्रमांकावर फलंदाजी करत, भारताच्या या अष्टपैलूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ६२ केले. त्याचबरोबर महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्या स्थानावर फलंदाजी करणाऱ्यांपैकी सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम तिच्या नावावर घेतला. शेवटची १२.२ षटके बाकी असताना ती फलंदाजी करायला आली. तिने रॉड्रिग्जसोबत आठव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. तिची ४६ चेंडूंची आक्रमक खेळी सात चौकार आणि दोन षटकारांनी सजली होती. याशिवाय, तिने रेणुका सिंग ठाकूरसह गोलंदाजीची सुरुवात केली आणि आठ षटकांत ४१ धावा देऊन एक विकेट पटकावली.

ताहलिया मॅकग्रा: ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधाराला बहुतेक मुंबईत खेळायला खूप आवडतय. मुंबई दौऱ्याची सुरुवात तिने कसोटी सामन्यात एका पाठोपाठ एक अर्धशतके ठोकून केली. त्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने पुन्हा एक अर्धशतक झळकावले. या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने ५५ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावा केल्या. ३१ व्या षटकात ती फलंदाजीला आली. तेव्हा तिच्या संघाला आणखी ११३ धावांची गरज होती. तिने शेवटपर्यंत फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिच्या फलंदाजीसोबतच ती उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाजी करते.

फीबी लिचफिल्ड: ऑस्ट्रेलियाच्या या सलामीच्या फलंदाजाने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८९ चेंडूत ७८ धावांची शानदार खेळी केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार जिंकला. १२ वा एकदिवसीय सामना खेळत असलेल्या या २० वर्षीय खेळाडूने भारतीय वेगवान आणि फिरकी आक्रमणाविरुद्ध चांगली खेळी केली. तिचा डाव आठ चौकार आणि एका षटकाराने सजला होता. या प्रक्रियेत, तिने एलिस पेरीसोबत दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचून तिच्या संघाला सांभाळले ज्याने आपली कर्णधार अॅलिसा हिलीला पहिल्याच षटकात गमावले होते.

Photo credit: AP

 

खेळपट्टी

या ठिकाणी आजपर्यंत सात महिला एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी चार जिंकले आहेत. भारत महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना येथे होणार आहे. पहिला सामना जो इथे खेळवला गेला होता त्यात ५५० हून अधिक धावा झाल्या. आणखी एक उच्च स्कोअरिंग स्पर्धेची अपेक्षा आहे कारण परिस्थिती फलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्याचबरोबर फिरकीपटूंची भूमिका महत्वाची असेल कारण मागील सामन्यात १२ विकेट्सपैकी सात विकेट्स त्यांनी घेतल्या.

 

हवामान

हवामान धुके राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. ६१% ढगांचे आच्छादन असेल. पावसाची शक्यता नाही. दक्षिण-आग्नेयेकडून वारे वाहतील.

 

माइलस्टोन अलर्ट

  • हरमनप्रीत कौरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५०० धावा पूर्ण करण्यासाठी ९८ धावांची गरज आहे
  • दीप्ती शर्माला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ६७ धावांची गरज आहे आणि १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ६ विकेट्सची आवश्यकता आहे

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ३० डिसेंबर २०२३

वेळ: दुपारी १.३० वाजता

स्थळ: वानखेडे स्टेडियम, मुंबई

प्रसारण: जिओ सिनेमा