भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलिया येथे खेळवली जाणार आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने ५ डिसेंबर आणि ८ डिसेंबर रोजी ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फील्डवर खेळले जातील आणि तिसरा आणि अंतिम सामना ११ डिसेंबर रोजी पर्थमधील वाका येथे खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाची नियमित कर्णधार ॲलिसा हिलीच्या अनुपस्थितीत ताहलिया मॅकग्रा ही संघाची जबाबदारी सांभाळेल.
आमने-सामने
ऑस्ट्रेलिया आणि भारत ५३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ४३ जिंकले आहेत तर भारताने १०. ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या १६ पैकी चार एकदिवसीय सामने भारताने जिंकले आहेत.
संघ
ऑस्ट्रेलिया: ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशलेह गार्डनर, किम गर्थ, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, सोफी मोलिन्यू, बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी, मेगन शुट, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, जॉर्जिया वॉल.
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, उमा चेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तीतस साधू, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, सायमा ठाकोर.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
एलिस पेरी: ऑस्ट्रेलियाच्या या अनुभवी अष्टपैलू खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये जवळपास ४००० धावा केल्या आहेत. तसेच तिच्या नावावर १६५ विकेट्स आहेत. ही ३४ वर्षाची अष्टपैलू एकदिवसीय सामन्यांमध्ये सध्याच्या ऑस्ट्रेलियाच्या संघात सर्वात जास्त धावा आणि विकेट घेणारी खेळाडू आहे.
मेगन शुट: ऑस्ट्रेलियाच्या या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२३ विकेट्स घेतल्या आहेत. तिची नव्या चेंडूने केलेली कामगिरी लक्षणीय असते. ती विलक्षण इन-स्विंगर्सचा वापर करून फलंदाजांना सतावू शकते.
दीप्ती शर्मा: ही भारतीय अष्टपैलू खेळाडू तिच्या संघासाठी बॅट किंवा चेंडूने एक हाती सामने जिंकू शकते. या उजव्या हाताच्या ऑफस्पिनरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० पेक्षा जास्त विकेट्स पटकावल्या आहेत आणि २००० हून अधिक धावा झळकावल्या आहेत.
हरमनप्रीत कौर: भारताच्या कर्णधाराने ११६ एकदिवसीय डावांमध्ये जवळपास ४०च्या सरासरीने ३६४८ धावा केल्या आहेत. ही उजव्या हाताची फलंदाज मधल्या फळीतील प्रमुख खेळाडू असेल.
मैदानाची आकडेवारी
* ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी १८ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत
* भारत या ठिकाणी पहिला एकदिवसीय सामना खेळेल
* प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे खेळल्या १८ पैकी नऊ महिला एकदिवसीय सामने जिंकले आहेत
* पहिल्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ३२५
* सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग २५३
हवामान
सकाळी काही सरींची अपेक्षा करा. अन्यथा, हवामान ढगाळपणासह दमट असेल. सरासरी तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: ५ डिसेंबर, २०२४
वेळ: सकाळी ९:५० वाजता
स्थळ: ॲलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार