२ एप्रिल २०११ ज्या दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यात वानखेडे स्टेडियमवर आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला तो दिवस अजूनही आपल्या मनात ताजा आहे. गेल्या १२ वर्षात दोन्ही संघात बरेच बदल झाले आहेत. त्यांच्या अलीकडच्या कामगिरीच्या संदर्भात, भारत आणि श्रीलंकेचे परिणाम विपरीत आहेत. भारत सहा पैकी सहा सामने जिंकून गुणतालिकेत आपले स्थान बळकट ठेवून आहे तर श्रीलंके सहा सामन्यांत केवळ दोन विजय प्राप्त करून नाजूक परिस्थितीत आहे.
२ नोव्हेंबर रोजी, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ३३ वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका एकमेकांविरुद्ध खेळतील.
भारत आणि श्रीलंका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
भारत आणि श्रीलंका यांनी १९७९ पासून एकमेकांविरुद्ध १६७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने ९८ जिंकले आहेत, श्रीलंकेने ५७ जिंकले आहेत, एक सामना टाय झाला आणि ११ सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी ५४ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने ३९ जिंकले आहेत, श्रीलंकेने १२ जिंकले आहेत आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. विश्वचषकात, भारत आणि श्रीलंका ४-४ अशा बरोबरीत असून एका सामन्याचा निकाल लागला नाही.
भारत | श्रीलंका | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | १ | ७ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | ९८ | ५७ |
भारतात | ३९ | १२ |
विश्वचषकात | ४ | ४ |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील भारत आणि श्रीलंकेची आतापर्यंतची कामगिरी
भारत आणि श्रीलंका आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला सातवा सामना खेळतील. या स्पर्धेत श्रीलंकेला पुष्कळ दुखापतींनी ग्रासले आहे, जे त्यांच्या निराशाजनक कामगिरीसाठी जबाबदार आहेत. दुसरीकडे, तिन्ही विभागात खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याने भारत अजिंक्य ठरला आहे.
सामना क्रमांक | भारत | श्रीलंका |
१ | ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव | दक्षिण आफ्रिकेकडून १०२ धावांनी पराभव |
२ | अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव | पाकिस्तानकडून ६ विकेटने पराभव |
३ | पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव | ऑस्ट्रेलियाकडून ५ विकेटने पराभव |
४ | बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव | नेदरलँड्सचा ५ विकेटने पराभव |
५ | न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव | इंग्लंडचा ८ विकेटने पराभव |
६ | इंग्लंडचा १०० धावांनी पराभव | अफगाणिस्तानकडून ७ विकेटने पराभव |
संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
श्रीलंका: कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, महीष थीकशाना, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, अँजेलो मॅथ्यूज, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा
दुखापती अपडेट्स
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या घोट्याच्या दुखापतीतून सावरत असून भारताचा हार्दिक पंड्या श्रीलंकेच्या सामन्याला मुकणार आहे. याशिवाय, श्रीलंकेसाठी, त्यांना आधीच अनेक दुखापतींचा फटका बसला आहे, ज्यात दासून शनाका, मथेशा पाथिराना आणि लाहिरू कुमारा यांचा समावेश आहे.
खेळण्याची परिस्थिती
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील तिसरा सामना हे ठिकाण आयोजित करेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३५०+ धावा केल्या आहेत आणि येथे खेळलेले पहिले दोन सामने जिंकले आहेत. धावांच्या मेजवानीची अपेक्षा करा.
हवामान
हवामान खूप उबदार असेल. दिवसभरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. १८% ढगांचे आच्छादन असेल आणि पावसाची शक्यता नाही. दक्षिणेकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
रोहित शर्मा: भारताचा कर्णधार सहा सामन्यात ६६ च्या सरासरीने आणि ११९ च्या स्ट्राईक रेटने ३९८ धावा करून त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या फलंदाजीसोबतच त्याचे नेतृत्व प्रभावी ठरले आहे. मुंबईकर असलेला रोहित आपल्या होम ग्राउंडवर काय कडक फलंदाजी करतो याची सर्वांना उत्सुकता असेल.
जसप्रीत बुमराह: भारताचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मुंबईसाठी त्याचे फ्रेंचायझी क्रिकेट खेळतो ज्यात वानखेडे हे त्याचे होम ग्राउंड आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत सहा सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या असून त्यात एक चार विकेट हॉलचा समावेश आहे.
सदीरा समरविक्रमा: श्रीलंकेच्या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाची या विश्वचषकात सरासरी ८३ आणि १०४ चा स्ट्राइक रेट आहे. सहा सामन्यांत ३३१ धावा करून तो आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
दिलशान मधुशंका: श्रीलंकेचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज नवीन चेंडूने उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. त्याने सहा सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात एका चार विकेट हॉलचा समावेश आहे.
आकड्यांचा खेळ
विराट कोहलीला (४८) सचिन तेंडुलकर (४९), ज्याचे सर्वाधिक शतके आहेत, त्याची बरोबरी करण्यासाठी एका शतकाची गरज
श्रेयस अय्यरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ६५ धावांची गरज
महीष थीकशानाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची आवश्यकता
कुसल मेंडिसला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५०० धावा पूर्ण करण्यासाठी १७ धावांची गरज
चारिथ असलंकाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ५७ धावांची गरज
दिमुथ करुणारत्ने त्याचा ५० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे
सदीरा समरविक्रमाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी ५४ धावांची गरज
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: २ नोव्हेंबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: वानखेडे स्टेडियम, मुंबई
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)