उन्हाळ्यात मैदाने मुलांसाठीच; बांगलादेशी फेरीवाल्यांची चौकशी

विविध मागण्यांसाठी भाजपचे निवेदन

ठाणे: नौपाडा परिसरातील मैदाने उन्हाळ्यात मुलांसाठीच उपलब्ध व्हावीत तसेच बांगलादेशी फेरीवाल्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने ठाणे महापालिकेकडे केली.

आज भाजपाच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे व माजी नगरसेवक सुनेश जोशी ह्यांनी नौपाडा परिसरातील मैदाने मुलांना उन्हाळी व हिवाळी सुट्टीत खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध व्हावीत तसेच या दिवसात ती व्यवसायिक वापरास देण्यात येऊ नयेत याविषयी आणि सध्या नौपाड्यातील राम मारुती रोड, गोखले रोड, स्टेशन रोडवर फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली असून त्यात काही बांगलादेशी फेरीवालेही असण्याची शक्यता असल्यामुळे या सर्व फेरीवाल्यांवर त्यांची आधारकार्ड तपासून त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई व्हावी या दोन्ही विषयासंबंधीचे निवेदन ठामपा आयुक्तांना दिले.

या दोन्ही निवेदनांची सकारात्मक दखल घेत त्यांनी सुट्टीच्या दिवसात मुलांना खेळण्यासाठीच फक्त मैदाने उपलब्ध राहतील, या संबंधीचा निर्णय लवकरच घेण्याचे आश्वासन दिले. फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे व त्यासाठी वाहने उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या.
याप्रसंगी आतिरिक्त आयुक्त माळवी आणि भाजपा नौपाडा मंडल चिटणीस सुशांत फाटक यांची प्रमुख उपस्थिती होती.