कोरोनामुळे एकाचा मृत्यू
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ४४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.
आजच्या या ४४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४३ हजार ४९९ झाली आहे. यामध्ये ६८२ रुग्ण उपचार घेत असून एक लाख ४० हजार ४६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत २७७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजच्या ४४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व दोन, कल्याण पश्चिम-२२, डोंबिवली पूर्व नऊ, डोंबिवली पश्चिम येथील ११ रुग्णांचा समावेश आहे.