ठाणे: ठाण्यातील गोकुळ नगरात यंदा गोकुळहंडीचा जल्लोष ठाणेकर अनुभवणार आहेत. एकूण 51 लाखाची बक्षिसे आणि विविध एकूण 51 लाखांची बक्षीसे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च असणारी गोकुळ हंडी यंदा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.या दहीहंडीचे आयोजन भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केले आहे.
भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही गोकुळ हंडी उभारली जाणार आहे. एकूण 51 लाखांची बक्षीसे असणाऱ्या या दहीहंडीत ठाण्यातील स्थानिक गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र पारितोषिक आहेत. तर मुंबईसह मुख्य खुल्या गटातील गोविंदा पथक यांच्यासाठी स्वतंत्र बक्षिसे असणार आहेत. सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकास बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय महिलांसाठी स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत. गोविंदांच्या सुरक्षेसाठी आयोजकांमार्फत विशेष काळजी घेण्यात आली असून वैद्यकीय उपचार देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या दहीहंडी उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. गोकुळ दहीहंडी उत्सवाला गोकुळ डेअरीचे चेअरमन व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.
या दहीहंडी उत्सवा दरम्यान सर्व गोविंदा पथकांसाठी दिवसभर मोफत अन्नदान उपक्रम कृष्णा पाटील यांच्यामार्फत राबविण्यात येणार असून सर्व गोविंदा पथक व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृष्णा पाटील यांनी केले आहे. नोंदणी अर्ज भरण्यासाठी 8383005005 तसेच 9152552575 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.