प्रत्येक मुलीसाठी तिचं लग्न हा तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. लग्न म्हणजे केवळ काही तासांचा किंवा एका दिवसाचा सोहळा नसून कुटुंबासाठी एक उत्सवच असतो. ज्यामध्ये अनेक विधी असतात. वधुला प्रत्येक विधी समारंभ कायम आठवणीत राहील असा करायचा असतो. लग्नात हळद, मेहंदी, संगीत, लग्न विधी ते पाठवणी पर्यंत नववधू वेगवेगळ्या रंगाचे, स्टाईलचे कपडे निवडते, जेणेकरून लग्नाच्या अल्बममधील तिचा प्रत्येक लूक वेगळा दिसावा. तर अशा या लग्नाच्या खरेदीसाठी आजचे हे सदर
साड्या हा भारतीय महिलांचा पारंपरिक पोशाख आहे. ज्यात स्त्रीचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. महिला लग्न सोहळ्यासाठी साड्या खरेदी करताना इतर महिलांपेक्षा वेगळं कसं दिसता येईल याकडे लक्ष देत असतात. चारचौघीत आपण कशा उठून दिसू आणि चार लोकं आपलंच कौतुक कसं करतील यादृष्टीने साड्या खरेदी करतात. लग्न असो किंवा हळदीचा कार्यक्रम किंवा साखरपुडा सगळ्या कार्यक्रमातील कॉमन फॅक्टर म्हणजे साडी खरेदी. सण उत्सवांना किंवा मोठ्या कार्यक्रमांना घरातील महिला आवडीने साड्यांची खरेदी करतात. सध्या लग्नसराई सुरू असून आपल्या कुटुंबात किंवा मित्रमंडळींमध्ये कोणाचे लग्न असेल तर आपण आवर्जून साडी नेसायचा प्लॅन करतो. अशावेळी नेसता येतील अशा साड्यांची खरेदी करण्यासाठी ठाण्यातील या काही दुकानांमध्ये साड्यांची खूप व्हरायटी उपलब्ध आहे.
नागरिक
येथे लग्नसराईसाठी साड्यांच्या खूप व्हरायटी बघायला मिळतात. लग्नाच्या साड्यांमध्ये पैठणी आणि बनारसी साड्यांचे भरपूर कलेक्शन आहेत, त्याबरोबरच सध्याच्या फॅशन नुसार डिझायनर साड्यांचे देखील कलेक्शन उपलब्ध आहेत. साड्यांमध्ये महिलांची पसंती काठपदरी साड्यांनाच जास्त आहे. या दुकानात ५०० रुपयांपासून साड्या उपलब्ध आहेत. या दुकानाची खासियत म्हणजे येथे वेगवेगळ्या डिझाईन व मनमोहक रंगाच्या साड्या उपलब्ध आहेत. तसेच आताच्या फॅशननुसार नववधूला रिसेप्शनकरीता ब्रायडल लेहेंगा, नेट लेहेंगा, वेलवेट लेहेंगा, सिल्क लेहेंगा उपलब्ध आहेत. येथे ३०००/- रुपयांपासून लेहेंगे उपलब्ध आहेत. आताच्या फॅशन आणि ट्रेंड नुसार नववधूची पसंती ही साड्यांबरोबरच लेहेंग्याला देखील आहे. या शॉपमध्ये साडीवर लागणाऱ्या ॲक्सेसरीज देखील उपलब्ध आहेत. तसेच नववधूच्या आवडीनुसार कस्टमाइज्ड लेहेंगा देखील मिळत असल्याचे श्री. मनसुख यांनी सांगितले.
रंगोली
लग्नसराईसाठी ठाण्यातील प्रसिद्ध अशा रंगोली या साड्यांच्या दुकानात पैठणी, बनारसी आणि साऊथ सिल्क साड्यांची बरीच व्हरायटी आहे. तसेच फॅन्सी डिझायनर साड्या आणि पारंपरिक साड्यांचे भरपूर कलेक्शन देखील येथे आहे. ५०० रुपयांपासून साड्यांची रेंज येथे पाहायला मिळते. येथे साड्यांबरोबरच लेहेंगा आणि लग्न – रिसेप्शनसाठी लागणाऱ्या गाऊनचे कलेक्शन देखील आहे. दुकानातील कर्मचारी महिलांना सिल्क आणि डिझायनर साड्या घेण्यास सुचवतात. पारंपरिक साडी, फॅन्सी डिझायनर साडी आणि लेहेंगा ही येथील खासियत आहे. येथे लेहेंग्याची रेंज ३०००/- रू.पासून सुरु आहे. त्याचबरोबर नववधू व ग्राहकांना आवडीनुसार लेहेंगा कस्टमाइज्ड करून मिळतो.
कलमकारी
कलमकारी शॉपमध्ये लेहेंग्याच्या खूप व्हरायटी उपलब्ध आहेत. वेलवेट लेहेंगा, सिल्क लेहेंगा, नेट लेहेंगा, ऑरगेंझा लेहेंगा आणि वेगवेगळे फॅब्रिकचे लेहेंगे येथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर गर्लिश लेहेंगा, क्रॉप टॉप स्कर्ट्स देखील येथे आहेत. कलमकारी येथे ६०००/- रुपयांपासून लेहेंग्याची सुरुवात होते. सध्याच्या फॅशननुसार मुलींना रिसेप्शन, साखरपुडा किंवा संगीतला लेहेंगा परिधान करण्यास आवडते. कलमकारी येथे रिसेप्शन, एंगेजमेन्ट, संगीत या कार्यक्रमांसाठी त्या त्या कार्यक्रमांना साजेसे असे लेहेंगे देखील उपलब्ध आहेत. या शॉपमध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार लेहेंगा कस्टमाइज्ड करून देखील मिळतात.
गंगा सारीज
गोखले रोड येथे असलेलं गंगा सारीज हे दुकान लग्नसराई निमित्त लागणाऱ्या साड्यांसाठी उत्तम आहे. कांजीवरम, सॉफ्ट सिल्क, धर्मावरम सिल्क, उपाडा सिल्क साड्या येथे उपलब्ध आहेत. येथील गढवाल सिल्क, पैठणी आणि बनारस सिल्क या साड्यांना तर महिलांची खूप पसंती आहे. १५००/- पासून पुढे येथे साड्या उपलब्ध आहेत. गंगा सारीज येथील कर्मचारी येथे येणाऱ्या महिलांना डिझायनर साडी, ट्रेडिशनल हॅन्डलूम सिल्क (ऑर्गेन्झा, टिश्यू सिल्क, डुपियन, क्रेप) या प्रकारच्या साड्या सुचवतात. ट्रेडिशनल हॅन्डलूम आणि एथनिक सिल्क, (इक्कत कॉटन, कलमकारी हॅन्ड पेन्टेड, माहेश्वरी कॉटन आणि चंदेरी कॉटन) या साड्या गंगा सारीजची स्पेशालिटी आहे.
शुभकन्या
ठाण्यातील राम मारुती रोड येथे असलेल्या शुभकन्या साड्यांच्या दुकानामध्ये पैठणी, येवला पैठणी, ईरकल साडी, कांजीवरम, पेशवाई, सिल्क साडी, प्रिंटेड सिल्क, धर्मावरम या सर्व प्रकारच्या साड्यांचे भरपूर कलेक्शन आहे. त्याचबरोबर हस्तकला पदर, डबल पदर, डिझाईन पदर अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदर पैठणीमध्ये उपलब्ध आहेत. या दुकानात ५५०/- पासूनच्या साड्या उपलब्ध आहेत. येथे येणाऱ्या महिलांना गढवाल सिल्क, महाराणी पैठणी, कालांजली पैठणी, फॅन्सी पैठणी तसेच शालूमध्ये डायमंड पॅटर्न खरेदी करण्यास सुचवतात. शुभकन्याची खासियत नऊवारी साडी, ट्रेडिशनल साडी, रेडिमेड नऊवारी साडी आहे. येथे १५ वेगेवेगळ्या प्रकारच्या नऊवारी साड्या शिवून देखील मिळतात.
सिमरन
राम मारुती रोड येथील सिमरन कलेक्शनमध्ये विविध प्रकारचे लेहेंगा उपलब्ध आहेत. येथील लेहेंगा ५०००/- रू.पासून सुरु आहेत. सध्या लेहेंग्याची डिमांड जास्त आहे. कारण रिसेप्शनसाठी नववधूची साडीपेक्षा लेहेंग्याला पसंती असते. येथे ट्रेडिशनल लेहेंगा आणि फॅन्सी लेहेंगा या दोन्ही प्रकारचे व्हरायटी लेहेंगे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेकदा नववधूची रिसेप्शन गाऊनला देखील तेवढीच पसंती असते तर येथे तुम्हाला गाऊनचे देखील खूप वेगेवेगळे कलेक्शन बघायला मिळतील. ग्राहकांच्या आवडीनुसार मापाप्रमाणे लेहेंगा शिवून देखील दिला जातो. तसेच ग्राहकांच्या आवडीनुसार लेहेंगा कस्टमाइज्ड देखील करून मिळतो.