महाराष्ट्राचा निकाल 100 टक्के
मुंबई : आयसीएसई दहावी बोर्डचा निकाल जाहीर झाला आहे. आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल 99.97% लागला आहे. आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रचा 100 टक्के निकाल आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 99.98 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 99.97 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत देशातून चार विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकवला आहे. पुण्याचा हरगुण कौर माथरू देशात पहिला आहे. 2,31,063 मुलांनी देशभरातून तर 26,083 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा दिली होती. त्यातून देशभरातून 1,25,678 मुले 1,05,385 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रात झाली होती. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे 2022 मध्ये झाली होती. आता या दोन्ही परीक्षांना समान वेटेज देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
विद्यार्थी आयसीएसई बोर्डाच्या https://results.cisce.org/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
यासाठी वेबसाईटवर ICSE Board Result 2022 या लिंकवर क्लिक करावा येथे युनिक आयडी आणि क्रमांक प्रविष्ट करावा. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
याशिवाय एसएमएसद्वारेही निकाल पाहता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी ICSE<Space><Unique Id> हा मेसेज 09248082883 या क्रमांकावर पाठवावा. यानंतर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे निकाल पाहता येणार आहे.