ठाणे मतदारसंघात दर्जेदार सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध

प्रचार फेरीत राजन विचारे यांनी नागरिकांना दिला विश्वास

ठाणे: ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षात अनेक विकासकामे केली असून युद्धपातळीवर प्रकल्प सुरू आहेत. त्याचबरोबर भविष्यात नव्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी मी कटिबध्द असल्याचा विश्र्वास राजन विचारे यांनी मतदारांना दिला. यावेळी जागोजागी मतदारांनी तुफान प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले.

गद्दारांना धडा शिकवण्याची हीच वेळ असून ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे, अशी साद घालत राजन विचारे यांनी आज जोरदार प्रचार केला. यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ता अनिश गाढवे, संपर्कप्रमुख सुभाष म्हसकर, उप जिल्हाप्रमुख सुनील पाटील, राजेंद्र महाडिक, समन्वयक संजय तरे, सह समन्वयक राम काळे, विभाग प्रमुख वासुदेव भोईर, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी अध्यक्ष सुहास देसाई, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विक्रम खामकर, महेश म्हात्रे सरचिटणीस कॉंग्रेस, आपचे सलुजा, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आज सकाळी घोडबंदर येथील हायलँड पार्क ढोकाळी येथून प्रचाराला सुरूवात झाली. रुणवाल सिटी येथून पुढे बाळकुम नाका, दादलानी पार्क, बाळकुम पाडा, लोढा कॉम्प्लेक्स, माजिवडा गाव, ऋतू पार्क,आनंद पार्क, श्रीरंग सोसायटी,वृंदावन सोसायटी, रुस्तमजी, पंचगंगा,राबोडी, मीनाताई ठाकरे चौक,गोकुळ नगर गोल्डन डाईज, नारळीपाडा, रुणवाल नगर, कोलवाड, जागमाता मंदिर, कोलबाड, प्रताप सिनेमा, खोपट, गोकुळदास, सिद्धेश्वर तलाव, टेंभी नाका,सिविल हॉस्पिटल,उथळसर, सेंट्रल मैदान पोलीस लाईन, धर्मवीर शक्तीस्थळ, खारकर आळी, सिडको, स्टेडियम ठाणा कॉलेज, खारटन रोड, तलावपाळी सिग्नल, काँग्रेस कार्यालय अशा परिसरातून प्रचाराची रॅली निघाली.

या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू घसरली असून त्यांना चांगलाच घाम फुटलेला असल्याचा आरोप विचारे यांनी केला. त्यामुळेच वायफळ भाषण करण्यात ते व्यस्त आहेत. मुळात लोकसभासारख्या निवडणुकीत देशहिताचे, राष्ट्रहिताचे, राज्याच्या दृष्टिकोनातून विकासाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवेत. मात्र त्यांचा अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड करून जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला.