टिसा-कोसिआचा प्रशिक्षण कार्यक्रम
ठाणे : ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) व चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (कोसिआ) यांच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू तरुण आणि तरुणींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक जणांनी उद्योग सुरू केले तर काहींना नोकऱ्या मिळाल्या.
रोजगार निर्मिती करणे, रोजगार वाढविणे व प्रशिक्षणार्थीला उद्योगाशी निगडित संपूर्ण व्यावहारिक ज्ञान देणे आणि त्यांच्यामध्ये रोजगाराभिमुख कौशल्य निर्माण करणे हा या प्रशिक्षणामागचा मूळ हेतू असून याचा लाभ आतापर्यंत चार हजारहून जास्त तरुणांनी घेतला आहे.
कौशल्य प्रशिक्षणांतर्गत अकाऊंट असिस्टंट, टॅली ऑपरेटर, टॅली जीएसटीसह संपूर्ण अकाउंटिंग आणि टॅक्सेशन कालावधी दोन महिने प्रत्येक दिवशी दोन तास असून बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम एक महिन्याचा आहे. त्यात विविध प्रकारचे केक्स, बिस्कीट्स व ब्रेड, नानकटाई, चॉकलेट्स, लादी पाव, बेसिक आयसिंग इत्यादी शिकवले जाते त्याशिवाय बेसिक टेलरींग (त्यात विविध प्रकारचे डिझाईन आणि ब्युटीपार्लर कोर्स तयार करण्यात आला आहे.
एका बॅचमध्ये साधारणपणे 20 प्रशिक्षणार्थी असतात. हे कौशल्य विकास प्रशिक्षण कल्याण, डोंबिवली, ठाणे, कांदिवली, चेंबूर येथे विविध केंद्रांवर होत असून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर कोसिआ या अखिल भारतीय शिखर संस्थेच्या वतीने तसेच स्थानिक केंद्रातर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
संस्थेतर्फे वरील सर्व विषयाचे प्रशिक्षण तज्ञांद्वारे दिले जात असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण शुल्क प्रशिक्षणार्थीकडून आकारले जात नाही, परंतु कोर्सच्या अटी आणि शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या तरुण-तरुणींना कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोशिएशनच्या टीसा हाऊस, रोड नंबर १६, प्लॉट नंबर पी २६ वागळे इंडस्ट्रियल इस्टेट येथील भ्रमणध्वनी क्रमांक 7718879254 कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.