पौरोहित्याच्या पात्रता परीक्षेला रमा कशी सामोरी जाणार?

‘कलर्स मराठी’ वरील ‘रमा राघव’ या मालिकेत रमाने पौरोहित्याचा वसा घेतल्याने घर तसेच समाजात  त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. राघव, सासरे गजानन आणि आजीसासू तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत तर सासू शालिनी दोलायमान अवस्थेत आहे.

रमाच्या सख्ख्या आईला लावण्याला काहीही करून राघवसोबतच लग्न मोडून रमाला परत मिळवायचे आहे,त्यासाठी तिने गजानन गुरुजींचा जुना शिष्य आणि आताचा शत्रू दिग्विजय सोबत हातमिळवणी केली आहे. गजानन गुरुजींचा पौरोहित्याचा वसा देण्याचा हा निर्णय चुकीचा ठरवून लावण्या आणि दिग्विजयला आपला स्वार्थ साधायचा आहे. त्यासाठी दिग्विजयने रमाला पौरोहित्यासाठी पात्रता सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे आणि त्याकरता परीक्षा घेतली जाणार आहे.

या पात्रता परीक्षेला रमा कशी सामोरी जाईल? ही परीक्षा नेमकी कशी असेल, किती कठीण असेल,रमा ती उत्तीर्ण होईल का ? रमाने सासरच्या कुटुंबाची परंपरा पुढे नेण्याचा घेतलेला निर्णय ती कसा सार्थ ठरवणार? हे पाहण्यासाठी नक्की बघा, रमा राघव, महारविवार, २५ फेब्रुवारी, दु. १.०० वा. आणि संध्या. ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.