रूपाली आणि अस्तिकाला हरवून नेत्रा युद्ध कसं जिंकते हे आपल्याला सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या २९ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.
मनोरमाच्या अस्थि इंद्राणीला परत मिळतील, याबद्दलची सर्वांची आशा मावळू लागते. त्याचवेळी नेत्राइंद्राणीला एक आशेचा किरण दिसतो. त्या दोघी ठरवतात, रूपाली जेव्हा अस्तिकाला भेटायला जाईल तेव्हाच तिचा पाठलाग करायचा. ठरल्याप्रमाणे नेत्रा-इंद्राणी रूपालीचा पाठलाग करतात. अव्दैतला मात्र नेत्राच्या जीवाला धोका तर नाही ना, अशी चिंता लागून राहते. पण नेत्राला दिलेल्या वचनामुळे अव्दैत घरीच थांबतो.
नेत्रा आणि इंद्राणी आपला पाठलाग करत आहेत हे रूपालीला आधीच माहित असल्यामुळे रूपाली इंद्राणीवर हल्ला करून तिला बेशुद्ध करते. त्यानंतर नेत्रावर हल्ला करणार तोच नेत्रा रूपालीचा हात धरून तिचा हल्ला रोखते. त्याचवेळी अस्तिकाही तिथे येते.
एका बाजुने रूपाली आणि एका बाजुने अस्तिका अशा पद्धतीने दोघांनाही नेत्राने रोखून धरल्यामुळे त्या दोघींना काहीच करता येत नाही. नेत्राने गळा धरल्यामुळे अस्तिकाचा जीव घुसमटतो. त्यानंतर अस्तिका नागरूपात येते. नागरूपात आल्यावरही अस्तिकाला नेत्राचा प्रतिकार करता येत नाही. अस्तिका जखमी होऊन जमिनीवर पडते. अशा प्रकारे कलियुगातील अंतिम युद्धाला सुरुवात होते. पण रूपाली आणि अस्तिकाला हरवून नेत्रा अंतिम युद्ध कसं जिंकते हे आपल्याला २९ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.