फिजिओथेरपी किती दिवस घ्यावी? उपचार पद्धतीचे टप्पे

मागच्या भागात आपण फिजिओथेरपिस्ट द्वारे केल्या जाणाऱ्या शारीरिक निदान (Physical Diagonasis) बद्दल जाणुन घेतले. आजच्या भागात उपचाराच्या स्टेजसची माहिती घेऊयात.

शस्त्रक्रिया किंवा दुखापत यातुन होणाऱ्या रेकव्हरी च्या वेगवेगळ्या स्टेजस असतात. प्रत्येक स्टेजची ध्येय (Goals) आणि आव्हाने (Challanges) ही वेगवेगळी असतात.

१) तीव्र वेदना – दुखापती किंवा शस्त्रक्रियेनंतर तीव्र वेदना होतात. उपचाराच्या हया टप्प्यात वेदना, सुज, जळजळ (Inflammation) कमी करणे यावर भर दिला जातो. शक्यतो मशीन ट्रीटमेंट चा वापर केला जातो. त्यात पारंपरिक मशीन जसे की अल्ट्रासाऊंड आणि इतर इलेक्ट्रिकल उत्तेजन चा (Stimulation) वापर केला जातो.

२) दुसऱ्या टप्प्यात (Sub-acute Phase) वेदना आणि जळजळ (Inflammation) ही कमी झालेली असते. तेव्हा फिजिओथेरपिस्ट मशीन ट्रीटमेंट कमी करुन Mannual Therapy, Joint Mobilization, व्यायाम ( Therapeutic Exercises) चे उपचार चालु करतात. ह्या टप्प्यात हालचाल ( Range of Motion) वाढवण्यावर भर दिला जातो.

३) पुनर्वसन ( Rehabilation) –   हया टप्प्यात दैनंदिन जीवनातील हालचाली, काम सुरळीत करण्यावर भर दिला जातो (Restoring Optimal function and returning to daily activities). उपचार पद्धती मध्ये Cardio vascular conditioning, Balance Training आणि खेळाडू साठी त्या खेळाशी संबंधित हालचाली च्या व्यायाम वर भर दिला जातो.

४) देखभाल (Maintaince) – दैनंदिन हालचाली व्यवस्थित सुरू झाल्यावर फिजिओथेरपिस्ट स्नायूची ताकद कायम राहील असे व्यायाम देतात. पुन्हा एकदा अशा प्रकारेची वेदना होऊ नये यासाठी ही व्यामाम दिले जातात.   फिजिओथेरपिस्ट बरोबर Periodic Checkups ही सुचवले जातात.

प्रत्येक रुग्णाची Recovery ही वेगवेगळी असते. त्याचा कालावधी हा पूर्णपणे दुखण्याचा प्रकार, वेदनेची तीव्रता, रुग्णाचे वय व प्रकृती आणि उपचार पद्धती चे पालन यावर अवलंबून असते.

वत्सला वेलनेस फिजिओथेरपी सेंटर मध्ये पारंपरिक उपचार पद्धती बरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कमी वेळेत जास्त प्रमाणात परिणाम (Recovery) मिळू शकतात.

आपल्या १५ सहकर्यांसोबत डॉ. स्मृती सोरटे ह्या वत्सला वेलनेस फिजिओथेरपी सेंटर च्या माध्यमातून गेली १२ वर्ष ठाणेकरांच्या सेवेत आहेत. नौपडा आणि घोडबंदर रोडवरील सेंटर बरोबरच वत्सला वेलनेस फिजिओथेरपी सेंटर मध्ये ऑनलाईन Consultation आणि Home Visit ची सुविधा ही उपलब्ध आहे.

डॉ स्मृती विशाल सोरटे (PT)
गोल्ड मेडलिस्ट (केईएम, मुंबई)
15 वर्षांचा अनुभव
वत्सला वेलनेस फिजिओथेरपी क्लिनिक
शाखा – राम मारुती रोड आणि घोडबंदर रोड
For Appointment – 9136848095 / 9136941509