ठाणे : १२० बेड असलेल्या होरायझन प्राइम हॉस्पिटल हे प्रमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे शहराच्या मध्यभागी असून या ठिकाणी अत्याधुनिक आणि फक्त महिलांसाठी राखीव विंगसह बर्थिंग युनिट आणि एनआयसीयु केंद्र सुरू करण्यात आले आहे.
ठाणे ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दत्ता पाणंदीकर यांच्या हस्ते खास महिलांसाठी असलेल्या या विंगचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. दत्ता पाणंदीकर हे एक प्रसिद्ध प्रॅक्टिसिंग गायनेकोलॉजिस्ट आणि एंडोस्कोपिक सर्जन आहेत, ज्यांना या क्षेत्रात जवळपास तीन दशके ज्ञान आणि अनुभव आहे.
हा स्त्री विभाग, जो हॉस्पिटलचा प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उच्च दर्जाची हा कक्ष काळजी घेईल आणि सर्व वयोगटातील स्त्रियांना सेवा पुरवेल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या आठ बाळंतपणाच्या खोल्या आणि सूट्स ५००० चौ.फुटाच्या क्षेत्रात पसरलेला आहे. यात बालकांसाठी एनआयसीयु हा कक्ष आहे जो बालकांची काळजी घेईल.
बाळंतपणाशिवाय, होरायझन प्राईम हॉस्पिटल स्त्री विभाग सर्वसमावेशक प्रसूती आणि स्त्रीरोग सेवा देखील पुरवणार आहे. होरायझन प्राईम हॉस्पिटलची शस्त्रक्रिया उपाययोजना प्रभावीपणे एन्डोमेट्रियोसिस, फायब्रॉइड्स, पीसीओडी, पांढरे स्त्राव यासारख्या जटिल विकारांना हाताळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डॉ. हृषिकेश वैद्य, मेडिकल डायरेक्टर आणि चेअरमन, होरायझन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की, स्त्रिया प्रत्येक कुटुंबाची जीवनरेखा आणि प्रत्येक घराचा मजबूत आधार आहेत. स्त्रियांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्यासाठी, आम्ही गर्भधारणेपूर्व आणि प्रसूतीनंतरची वैद्यकीय सुविधा आणि एनआयसीयु आणि पीडारहित प्रसूती सुविधा यासारख्या अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरवू.
डॉ. मनाली शिलोत्री, प्रमुख कन्सल्टंट स्त्रीरोगतज्ञ, होरायझन प्राईम हॉस्पिटल यावेळी म्हणाल्या की, गर्भधारणेच्या प्रवासात, प्रत्येक आईला उच्चतम काळजी आणि आरामाची गरज असते. आमचे केंद्र वेदानारहित प्रसूतीची सुविधा पुरवेल जिथे आता रुग्णांना वेदनेची चिंता करावी लागणार नाही. नार्मल डीलेव्हरीला हॉस्पिटल प्राधान्य देणार आहे. याशिवाय, आमच्या हॉस्पिटलच्या स्त्री विभागात प्रत्येक व्यक्तीच्या विशेष गरजांना तंतोतंत पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक मातृत्व सेवा उपलब्ध आहेत. गर्भधारणेपूर्व काळजी आणि प्रसूती शिक्षणापासून समुपदेशन आम्ही वाढत्या कुटुंबांच्या आरोग्य आणि आनंदाच्या प्रत्येक टप्प्यावर वचनबद्ध आहोत.
हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, लेबर रूम्स आणि मेडिकल क्रिटिकल केअर युनिट्स आहेत. हॉस्पिटल २४ /७ सेवा पुरवेल ज्यामध्ये पूर्णवेळ डॉक्टरांची टीम समाविष्ट आहे. ज्यात बालरोगतज्ञ, स्त्री रोगतज्ञ, प्रशिक्षित व अनुभवी नर्सेस आणि पोषणतज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश आहे. हा विभाग नवजात शिशु इंटेन्सिव केअर युनिट्स सेवा देखील पुरवते. आमची टीम हायरिस्क प्रेग्नन्सी, मासिक पाळीचे विकार, रजोनिवृत्तीच्या गुंतागुंती, स्त्रीरोग कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर (गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग), ब्रिस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) यांचे निदान व उपचार करण्यात कुशल आहे. अधिक माहितीसाठी 022- 68556855 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.