महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान

रोजच्या जीवनात ज्या महिलांच्या कर्तृत्वाचा स्पर्श होतो अशा भगिनी-गृहिणींचा सन्मान सिल्कलाईन आणि ठाणेवैभव यांच्या संयुक्त विद्यमाने महिलादिनी सिल्कलाईनच्या शोरूममध्ये करण्यात आला. सिल्कलाईनचे सुरेश जैन, कश्यप बौआ, ठाणेवैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या हस्ते या महिलांना गौरविण्यात आले. यावेळी सिध्दीविनायक रुग्णालयातील परिचारिका सिसिली फर्नांडिस, बस कंडक्टर विजयलक्ष्मी यादव, सफाई कामगार पार्वती भुतकर, पोस्टमन सुलभा लोखंडे, व्हॅन चालक वैशाली रेनोसे, वृत्तपत्र विक्रेत्या लता गवस, भाजी विक्रेत्या अलका काजळे या महिलांचा सन्मान करण्यात आला.