सोनी मराठी वाहिनीच्या नायिकांनी एकत्र साजरा केला ‘जागतिक महिला दिन’

सोनी मराठी वाहिनी नेहेमीच स्त्रीची निरनिराळी रूपे प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्नात असते. प्रसंगी कणखर, तर कधी मायाळू तर वेळ पडल्यावर जगदंबेच रूप सुद्धा बघायला मिळतं. सोनी मराठी वाहिनीवरील याच प्रतिभाशाली नायिकांनी एकत्र जागतिक महिला दिन साजरा केला. सेटवर केक आणून नायिकांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिला.

यावेळेस ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मधल्या ताराराणी अर्थातच स्वरदा थिगळे, बॉस माझी लाडाची मधील राजेश्वरी म्हणजेच भाग्यश्री लिमये, तुमची मुलगी काय करते मालिकेतील श्रद्धा म्हणजे मधुरा वेलणकर, सावनी म्हणजे जुई भागवत, ज्ञानेश्वर माऊली मालिकेतील मुक्ताई म्हणजेच मिथिला पाटील तर नवीन मालिका ‘ असे हे आमचे घर ‘ मालिकेतील सुभद्रा, काव्या, नारायणी अर्थातच सुकन्या मोने, संचिता पाटील, उषा नाडकर्णी आणि महिला निर्माती मानवा नाईक देखील उपस्थित होत्या.

औरंगजेबाशी लढणारी ताराराणी, भावांच्या पाठीशी उभी राहणारी मुक्ताई, घर सक्षमपणे हाताळणाऱ्या सासू सून, नोकरी सांभाळणारी राजेश्वरी आणि मुलींसाठी वेळप्रसंगी वाघीण होणारी श्रद्धा, अशी अनेक रूप सध्या वाहिनीवर बघायला मिळताय.