पावणेमधील केमिकल कंपनीला भीषण आग

नवी मुंबई: पावणे एमआयडीसीतील दर्शन केमिकल प्रा. लि. या केमिकल कंपनीत सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली आहे.

आगीची घटन समजताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, नवी मुंबई महानगर पालिका एक आणि टीबीआर असोसिएशन अग्निशमन दलाची एक गाडी अशा पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. कंपनीच्या पहिल्या माळ्यावर लागलेली आग क्षणातच तिसऱ्या माळ्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे आगीत कंपनी जळून खाक झाली आहे मात्र ४० मिनिटांच्या अथक प्रयत्नातून ही आग विझवण्यात अग्निशमन दलास यश आहे.

आगीत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती एमआयडीसी अग्निशमन प्रमुख मिलिंद ओगले यांनी दिली.