ठाणे : ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात “खाऊचा कोपरा” ही संकल्पना राबवली जात आहे, अशी माहिती आहारतज्ज्ञ डॉ.शीतल नागरे यांनी दिले.
ठाणे सिव्हील रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. काहीवेळा या रुग्णांबरोबर छोटी मुलेदेखील असतात. या लहान मुलांना भूक लागलीच तर बाहेरचेही खाद्यपदार्थ खाऊ दिले जातात. परंतु, असे खाद्यपदार्थ मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धागा पकडून डॉ. पवार यांनी या उपक्रमाचे कौतूक करून ‘खाऊचा कोपरा’ सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
लहान मुलांना बाहेरचे चटपटीत पदार्थ खाण्यासाठी देऊन पालकवर्ग मुलांच्या आरोग्याशी खेळत असला तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात येणा-या बालकांसाठी “खाऊचा कोपरा” ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली आहे.
रुग्णालयातील छोट्या जागेत मुलांना पोष्टिक आहार खाऊच्या माध्यमातून दिला जाणार असून विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे जिन्नस त्यासोबत फळे देण्यात येणार आहेत.
चटपटीत खाद्य पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतात.
रुग्णालयात फिरताना अनेकदा लहान मुलांच्या हातात वडापाव, चायनीज किंवा असे चटपटीत काहीतरी खाताना दिसून आले आहेत. डॉक्टरांनी यावेळी राऊंड घेताना रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. शितल नागरे यांच्या लक्षात आले. त्यामुळे जेवणांच्या व्यतिरिक्त मुलांना पौष्टिक आहार मधल्या वेळेत ‘खाऊचा कोपरा’या माध्यमातून देता येणार आहे आणि ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांना सांगितली.
रुग्णालयातील वॉर्डच्या एका कोप-याच्या सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला आहे आणि मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे खाऊ निवडून खाणे शक्य होणार आहे. खाऊच्या कोप-यात अनेकविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे जिन्नस भरले आणि त्यासोबत फळेही ठेवण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. संगीता माकोडे, भूलतज्ञ प्रियांका महंगाडे, डॉ. अर्चना पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे, डॉ गोपणपल्लिकर, विनोद जोशी आणि अधिसेविका प्रतिभा बर्डे आदी उपस्थित होते.