मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळून राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे बळही मिळावे असे शुभचिंतन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीतील हॉटेल अशोकामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून देशातील सर्वच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.