महिला दिनानिमित्त हस्तकला सारी वॉकेथॉनचे आयोजन ‘हस्तकला’मार्फत करण्यात आले होते. या उपक्रमात ३००० महिलांनी भाग घेतला. हा उपक्रम ‘हस्तकला’ आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या उपक्रमाला मनुभाई ज्वेलर्स, टिप टॉप, पायोनियर अँडव्हर्टायझिंगचे विशेष सहकार्य लाभले.
‘हस्तकला’चे संचालक प्रवीण छेडा, ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ, ‘टिप टॉप’चे संचालक जयदीप शाह आणि मनुभाई ज्वेलर्सच्या स्वाती शर्मा यांच्या हस्ते या वॉकेथॉनची सुरुवात करण्यात आली.