१ मे पासून दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात रंगणार पालकमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे सामने

ठाणे – महाराष्ट्र माझा सेवा संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारी मानाची पालकमंत्री चषक (ठाणे प्रिमियर लिग) टी 20 क्रिकेट स्पर्धा यंदा 1 मे ते 8 मे 2022 दरम्यान दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात रंगणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 1 मे राजी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

गेली 10 वर्ष ही स्पर्धा ठाण्यात संपन्न होत असून दिग्गज खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ठ आहे. अखिल हेरवाडकर, चिन्मय सुतार, कौस्तुभ पवार, जय बिस्ता, प्रथमेश डाके, प्रयाग भाटी, आकाश पारकर, सागर मिश्रा, रॉयस्टन डायस, सचिन यादव, एकनाथ केरकर हे दिग्गज खेळाडू यावर्षी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यावर्षी एकूण ठाणे जिह्यातील 16 संघानी भाग घेतला असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक मा. नगरसेवक विकास रेपाळे यांनी दिली आहे. स्पर्धेतील विजयी, उपविजयी संघ तसेच उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक, सामनावीर यांना आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवणार असल्याची माहिती महाराष्ट्र सेवा संस्थेने दिली आहे.