डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली

डोंबिवली: भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रविवारी 18 तारखेला डोंबिवलीत काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत भारतीय जनता पार्टी कार्यकारी प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सुलभा गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, मितेश पेणकर, कर्ण जाधव, धनाजी पाटील, प्रकाश पवार, शिवसेना आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुका प्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक संजय पावशे, गजाजन पाटील, संतोष चव्हाण, सागर जेधे,विवेक खामकर, कविता गावंड तेजस पाटील, संजय निक्ते यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. तिरंगा रॅलीत हजारो डोंबिवलीकर सहभागी झाले होते.

भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह हजारो डोंबिवलीकरांनी तिरंगा रॅलीत हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते. या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीगणेश मंदिर येथून तिरंगा रॅलीला सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद कॅप्टन विनयकुमार सच्चान येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आणि उपस्थित डोंबिवलीकरांनी भारत माता की जय म्हणत मानवदंना देवून राष्ट्रगीतानंतर रॅली समाप्त झाली.