पणजी : मशरूमपासून गोल्ड नॅनो पार्टिकल्स तयार केले जाऊ शकतात, असा दावा गोव्यातील वैज्ञानिकांनी केला आहे. त्यांनी हे करून दाखविले आहे. गोव्यातील वैज्ञानिकांनी जंगली मशरूमपासून गोल्ड नॅनो पार्टिकल्स तयार केले आहेत.
गोव्यात आढळणारे हे जंगली मशरूम टर्मिटोमायसेस जातीचे आहे. वैज्ञानिकांनी त्यापासून गोल्ड नॅनोपार्टिक्ल्स तयार केले आहेत. दीमक टेकड्यांवर उगवणाऱ्या या मशरूमला गोव्यातील स्थानिक लोक ‘रॉन ओल्मी’ नावाने ओळखतात. या मशरूमपासून शास्त्रज्ञांनी सोने तयार केले आहे.
टेलर आणि फ्रान्सिसद्वारे प्रकाशित जर्नल ऑफ जियोमायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, डॉ सुजाता दाबोलकर आणि डॉ. नंदकुमार कामत यांच्या नेतृत्वात हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यांच्या चमूने तीन वर्षे मशरूमच्या या वाणावर संशोधन केले. या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी रॉन ओलमी मशरूमपासून गोल्ड नॅनो पार्टिकल्स तयार केले. महत्वाचे म्हणजे, त्यांनी आपले संसोधन गोवा सरकारसमोरही ठेवले आहे.
सोन्याच्या नॅनो पार्टिकलला जागतिक बाजारात मोठी किंमत आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये एक मिलीग्रॅम सोन्याच्या नॅनोपार्टिकलची किंमत जवळपास 80 डॉलर अर्थात जवळपास 80000 रुपये प्रति ग्रॅम बरोबर होती. सोन्याच्या किंमतीचा विचार करता, बुधवारी 5 एप्रिल 2024 च्या डिलिव्हरी सोन्याचा दर घसरून 62,095 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.